महापौर विश्वनाथ महाडेश्वरांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

महापालिका (एच पूर्व) विभागातील खेरवाडी वांद्रे ( पूर्व) विधानसभा मतदारसंघासाठी विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेकडून इच्छुक आहेत. महत्वाचे म्हणजे इथून शिवसेनेच्याच आमदार तृप्ती सावंत विधानसभेत प्रतिनिधित्व करतात.

महापौर विश्वनाथ महाडेश्वरांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
Follow us
| Updated on: Jun 18, 2019 | 1:12 PM

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महापालिका (एच पूर्व) विभागातील खेरवाडी वांद्रे ( पूर्व) विधानसभा मतदारसंघासाठी महाडेश्वर शिवसेनेकडून इच्छुक आहेत. महत्वाचे म्हणजे इथून शिवसेनेच्याच आमदार तृप्ती सावंत विधानसभेत प्रतिनिधित्व करतात.

महापौरांच्या सूचनेनुसार या मतदारसंघातील 27 रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी 23 रस्त्यांच्या कामाला 26 नोव्हेंबर 2018 रोजी निविदा मागवून कंत्राटदार नेमण्यात आला. एस एम डेव्हलपर्सला हे काम देण्यात आलं आहे. तर 28 डिसेंबरला आणखी एक निविदा काढून विभागातील 4 रस्त्यांची कामे ठरवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या कामासाठीही एस एम डेव्हलपर्सची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आले आहेत.

यापूर्वी खेरवाडी वांद्रे पूर्व मतदारसंघात येणाऱ्या चमडावाडी नाल्याच्या रुंदीकरण कामात बाधित होणाऱ्या बेहराम पाड्यासह, आसपासच्या वस्त्यांमधील अनधिकृत झोपड्यांवर कारवाईऐवजी सर्व पात्र-अपात्र कुटुंबांचे पुनर्वसन करण्यास महापौरांनी महापालिका प्रशासनास भाग पाडले होते.

कोणत्या रस्त्यांची कामे :

पारशीवाडी रस्ता

के.जी.मोरे रस्ता

शास्त्रीनगर रस्ता

म्युनिसिपल दवाखाना ते चहाच्या गाळ्यापर्यंतचा रस्ता

नीलम सोसायटी ते निलकांत शेलटकर मार्ग

कदमवाडी रस्ता

अंकुर इमारतजवळील रस्ता

खेरनगर रस्ता क्रमांक २

खेरनगर रस्ता ५

हर्णे गुरुजी रस्ता

पीएफ कार्यालयामागील रस्ता

कालिनागाव रस्ता

शांतीनगर रस्ता

गोळीबार रस्ता ते नवजीवन सोसायटी

नेस्त्रे आवार रस्ता

जगत विद्या रस्ता

महात्मा सोसायटीजवळील गोळीबार रस्ता

लोकमान्य टिळक रस्त्यापासून सेवा रस्ता ते पिंपळेश्वर मंदिर

शांतीलाल आवार रस्ता

ए.के रस्ता ते एस.आर.ए ऑफीस

कोळीवरील गाव रस्ता

आदर्श लेन रस्ता

जे.पी. रस्ता संगमनस्थान ते वांद्रे वाहनतळ

जयप्रकाश रस्ता

दत्त मंदिर रस्ता, साईबाबा रस्ता

खेरवाडी रस्ता १

महापौर विधानसभेसाठी इच्छुक

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तशी इच्छा महाडेश्वर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे.

सध्या वांद्रे पूर्व मतदारसंघाचं नेतृत्त्व शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे तृप्ती सावंत यांचे पती प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेनेकडून तृप्ती सावंत तर काँग्रेसकडून नारायण राणे मैदानात होते. त्यावेळी नारायण राणे यांनी तृप्ती सावंत यांना फाईट दिली होती. मात्र तृप्ती सावंत यांनीच बाजी मारत तब्बल 19 हजार मतांनी राणेंवर विजय मिळवला होता.

ज्या मतदारसंघात नारायण राणे हरले, त्याच वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानातून उतरण्याची तयारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.

विश्वनाथ महाडेश्वर हे सध्या देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईचं महापौरपद भूषवत आहेत. 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक 84 जागा मिळवल्या होत्या.  त्यानंतर शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौरपदी निवड झाली.

संबंधित बातम्या  

नारायण राणेंचा जिथे पराभव झाला, तिथून मुंबईचे महापौर विधानसभा लढणार?  

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.