Sharad Pawar : शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले तेव्हा…

Minister Chhagan Bhujbal on Sharad Pawar : या वर्षीच्या मे महिन्यात शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता?; छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांनी 'ते' महत्वाचं कारण सांगितलं आहे. पाहा काय म्हणाले, छगन भुजबळ काय म्हणाले...

Sharad Pawar : शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले तेव्हा...
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 9:58 AM

मुंबई | 12 मुंबई 2023 : ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाचा कार्यक्रम होता. सभागृह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुडुंब भरलं होतं. तेव्हा कुणाही अपेक्षित नसलेली घटना घडली. शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. हा सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. यावेळी आपण राजीनाम मागे घ्या अन्यथा आम्ही सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर पुढे तीन दिवस राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. तीन दिवस राष्ट्रवादी पक्षात वेगवान घडामोडी घडत राहिल्या. त्यानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला अन् राष्ट्रवादीत आलेलं चर्चांचं वादळ थांबलं. पण या सगळ्यात एक प्रश्न अनुत्तरित राहिला. तो म्हणजे शरद पवार यांनी हा राजीनामा का दिला होता? या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिलं.

भुजबळ काय म्हणाले?

छगन भुजबळ यांची टीव्ही 9 मराठीवर मुलाखत झाली. यात त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. शरद पवार यांनी राजीनामा दिला. तेव्हा सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचं ठरलं होतं. सुप्रिया सुळे या अध्यक्ष होतील मग राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, असं ठरलं होतं, असं म्हणत छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

15 दिवस पवारांच्या घरात चर्चा झाली असावी. अजितदादांना ते माहिती होतं. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जायचं ठरलं होतं. म्हणूच शरद पवार यांनी राजीनामा दिला, असं छगन भुजबळ म्हणाले.

2019 ला झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दलही छगन भुजबळ यांनी सविस्तरपणे सांगितलं. शरद पवार यांनी भाजपला सोबत येण्याचा शब्द दिला. मात्र ते भाजपसोबत गेले नाहीत. पण शब्द खरा करण्यासाठी, दिलेला शब्द पाळण्यासाठी अजित पवार भाजपसोबत गेले आणि पहाटेचा शपथविधी घेतला, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.