BMC Election 2022 Ward 224 : काँग्रेसला तगडी टक्कर एमआयएमची! मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट वॉर्डात काँग्रेस कायम ठेवणार सत्ता?
दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट या 224 क्रमांकाच्या वॉर्डात काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते. अल्पसंख्याक समाजाची संख्याही या मतदारसंघात अधिक आहे. मुस्लीम मतदार हा विजयात महत्त्वाचा वाटेकरी आहे.
मुंबई : बीएमसी अर्थात मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीत दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा वॉर्ड म्हणजे प्रभाग क्रमांक 224… क्रॉफर्ड मार्केटसह (Crawford Market) पायधुनी आणि इतर महत्त्वाचे विभाग या प्रभागात येतात. दक्षिण मुंबईतील एक व्यापारी ठिकाण म्हणूनही हा परिसर ओळखला जातो. 2017च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत याठिकाणी चौरंगी लढत झाली होती. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि एआयएमआयएम अशा चारच पक्षांमध्ये याठिकाणी लढत रंगली होती. यात बाजी काँग्रेसने (Congress) मारली होती. सर्वच पक्षांनी दोन हजारांच्या वर मते मिळवली होती. विशेष म्हणजे काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिला तो एआयएमआयएम पक्षाचा उमेदवार. तर मुंबई महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता आहे, त्या शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वात कमी मते मिळाली होती. तीन हजारांचा आकडा सेना गाठू शकली नव्हती.
उमेदवार आणि मिळालेले मतदान (2017)
सरला रमेश गवादे (भाजपा) – 3001
हफिजी तयबा मोहम्मद जाफर (एमआयएम) – 5854
विजयश्री शैलेंद्र साखरे (शिवसेना) – 2605
आफरिन जावेद शेख (काँग्रेस) – 7881
कोणाला किती मते?
दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट या 224 क्रमांकाच्या वॉर्डात काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते. अल्पसंख्याक समाजाची संख्याही या मतदारसंघात अधिक आहे. मुस्लीम मतदार हा विजयात महत्त्वाचा वाटेकरी आहे. एकूण मतदार 46,355 असून 19,482 वैध मते मागील वेळी उमेदवारांना मिळाली होती.
क्रॉफर्ड मार्केट कुठे?
क्रॉफर्ड मार्केट ज्याला महात्मा ज्योतिबा फुले मंडई असेही म्हटले जाते. हे दक्षिण मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक आहे. मूळतः शहराचे पहिले महापालिका आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांच्या नावावरून या बाजाराचे नाव नंतर महाराष्ट्रीय समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या सन्मानार्थ बदलण्यात आले. हे मार्केट मुंबई पोलीस मुख्यालयासमोर, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या उत्तरेस आणि जे. जे. च्या पश्चिमेस आहे.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
Mahatma Phule Market (Crawford Market), Victoria Dock, Bengali Pura Koliwada, Mandvi, Paydhuni