BMC Election 2022 Abdul Hamid Road Ward 48 | भगव्याला धोबीपछाड देणारा मुंबईचा वॉर्ड क्रमांक 48, यंदाही काँग्रेसचा नगरसेवक निवडून येणार का?

2011 मधील जनगणनेनुसार, वॉर्ड क्रमांक 48 मध्ये 45, 870 एवढी लोकसंख्या आहे. यापैकी 1339 ही अनुसूचित जाती तर 141 ही अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे. मागील वेळी 29,697 एवढी मतदार संख्या नोंदणी झाली होती.

BMC Election 2022 Abdul Hamid Road Ward 48 | भगव्याला धोबीपछाड देणारा मुंबईचा वॉर्ड क्रमांक 48, यंदाही काँग्रेसचा नगरसेवक निवडून येणार का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 5:42 PM

मुंबईः BMC Election2022 | ward 48 | मुंबई महापालिका निवडणुकीचा  (Municipal Corpotion)बिगुल वाजलाय, तसा विविध वॉर्डांतील इच्छुकांची घालमेलही वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. महापालिकेने आरक्षण (BMC Reservation) सोडतही जारी केली आहे. त्यानुसार, कोणता वॉर्ड आरक्षित आणि कोणता खुल्या प्रवर्गासाठी, महिलांसाठी राखीव वॉर्ड कोणता, याची उत्तरंही मिळाली आहेत. त्यानुसार, पक्षाचं तिकीट कुणाला मिळेल, यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली आहे. महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 48 मध्येही अशीच चुरस दिसून येतेय. मागील वर्षीचं चित्र पाहिलं तर शिवसेनेच्या उमेदवाराला चांगलीच धोबीपछाड देत या मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवारानं बाजी मारली होती. काँग्रेसच्या सलमा अलमेलकर (Salma Almelkar) यांनी 2017 मध्ये येथील नगरसेवक पद पटकावलं होतं. आता हा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे. शिवसेना आणि काँग्रेसप्रमाणेच इतर पक्षांतील इच्छुकांनीही निवडणुकीच्या अनुशंगाने तयारी सुरु केली आहे. मागील वेळी विविध पक्षांनी महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे नशीब आजमावलं होतं. आता यंदा काँग्रेसची सत्ता असलेल्या या वॉर्डात कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

2017 मध्ये मतदारांचा कौल कुणाला?

प्रभाग – 48 मध्ये 2017 च्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या अलमेलकर यांना कौल दिला होता. इतर उमेदरांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे-

  • अलमेलकर सलमा सलीम- काँग्रेस- 6655
  • दशपूते विकास- शिवसेना – 2219
  • इस्माइल शेख- एमआयएम- 2347
  • अन्सारी मोहम्मद फिरोज समीद अहमद- अपक्ष- 165
  • सुशांत सुनिल माळवदे- मनसे- 390
  • मो. शमीम रेडिओवाला- भाजपा- 1601
  • मंगेश सदाशिव शेडगे- अपक्ष- 751
  • सईद शेख- समाजवादी पार्टी – 139
  • शरीफे शेख- राष्ट्रवादी काँग्रेस- 572

वॉर्डातील प्रमुख भाग कोणते?

न्यू कलेक्टर कंपाउंड, सामना नगर, गायकवाड नगर, मालवणी बस डेपो, अब्दुल हमीद रोड हे भाग वॉर्ड क्रमांक 47 मधील उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय घेतील.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

उत्तरेकडून अब्दुल हमीद रोड, ते दक्षिणेकडून पूर्वेकडे नाल्यापर्यंत, झोपडपट्टी, मार्वे क्रॉस रोड, महाकाली रोड, चिल्ड्रन पार्क, एव्हरशाइन ब्रीज, पश्चिमेकडे पार्किंग स्लॉटच्या कुंपण भिंतीपर्यंत, हयात मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटलपर्यंत, हाथी गार्डन, ओल्ड कलेक्टर कंपाउंड परिसर आदी भागापर्यंत या वॉर्डाच्या सीमा आहेत.

वॉर्डातील लोकसंख्या किती?

2011 मधील जनगणनेनुसार, वॉर्ड क्रमांक 48 मध्ये 45, 870 एवढी लोकसंख्या आहे. यापैकी 1339 ही अनुसूचित जाती तर 141 ही अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे. मागील वेळी 29,697 एवढी मतदार संख्या नोंदणी झाली होती.

वॉर्ड आरक्षित की खुला?

मुंबई महानगरपालिकेची नुकतीच आरक्षण सोडत जारी झाली असून या सोडतीनुसार, वॉर्ड क्रमांक 48 हा सर्वसाधारण गटात येतोय. त्यामुळे या प्रवर्गातील इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
काँग्रेससलमा अलमेलकरविजयी उमेदवार
शिवसेनाविकास दशपूते-
एमआयएमइस्माइल शेख-
भाजपामो. शमीम रेडिओवाला-
मनसेसुशांत माळवदे-
अपक्ष/इतर--
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.