BMC Election 2022 : वार्ड क्र. 204 मध्ये शिवसेना-भाजप मुख्य दावेदार, यंदा काय राहणार चित्र?
सन 2017 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले असले तरी शिवसेनेचे अनिल कोकीळ आणि भाजपाचे उमेदवार अरुण दळवी यांच्यातच खरी लढत होती. असे असताना 6 हजार 110 मतांनी कोकीळ हे विजयी झाले होते. वार्डातील मताधिक्याच्या तुलनेत हा मोठा विजय असला तरी इतर पक्षातील उमेदवारांना मतदारांनी डावलले आहे.
मुंबई : (BMC) मुंबई महानगरपालिकेच्या 204 वार्डामध्ये (Shivsena) शिवसेना आणि भाजपात खरी चुरस आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार अनिल सदाशिव कोकीळ यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. अनिल कोकीळ यांनी भाजपाचे उमेदवार अरुण दळवी यांचा 6 हजार 110 मतांनी पराभव केला होता. असे असले तरी गेल्या 5 वर्षात या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे यंदा होणाऱ्या (Election) निवडणुकीत भाजपाचे सेनेसमोर कडवे आव्हान राहणार आहे. इतर पक्षातील उमेदवरांना मतदारांनी डावलले आहे. शिवाय या वार्डामध्ये प्रमुख पक्षामध्ये लढत झाली होती. विशेष म्हणजे या वार्डात एकही अपक्ष उमेदवार 2017 च्या निवडणुकीत नव्हता. त्यामुळे मुख्य पक्षातील उमेदवार आपले सर्वस्व पणाला लावणार हे नक्की. हा वार्ड शिवसेनेचा मानला जात असला तरी यंदा या वार्डाकडे लक्ष लागले आहे.
6 हजार 110 मतांनी शिवसेना उमेदवार विजयी
सन 2017 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले असले तरी शिवसेनेचे अनिल कोकीळ आणि भाजपाचे उमेदवार अरुण दळवी यांच्यातच खरी लढत होती. असे असताना 6 हजार 110 मतांनी कोकीळ हे विजयी झाले होते. वार्डातील मताधिक्याच्या तुलनेत हा मोठा विजय असला तरी इतर पक्षातील उमेदवारांना मतदारांनी डावलले आहे. त्यामुळे यंदाची निवडणुक नेमक्या कोणत्या मुद्द्यावर होणार यावरच येथील राजकीय गणिते अवलंबून आहेत.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | अनिल सदाशिव कोकीळ | |
भाजप | अरुण दळवी | |
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | सावंत प्रकाश रामकृष्ण | |
मनसे | देसाई सचिंद्र गणपत | |
अपक्ष / इतर |
अपक्षाविना प्रमुख पक्षांमध्येच खरी लढत
वार्ड क्र. 204 मध्ये भाजपा, शिवसेना, मनसे, बहुजन समाज पार्टी आणि कॉंग्रेसमध्येच लढत झाली होती. इतर वार्डामध्ये अपक्षांच्या मतावर विजयी उमेदवार ठरला गेला असला तरी 2017 च्या निवडणुकीत या वार्डामध्ये अपक्षाने या वार्डात नशीब आजमावलेच नव्हते. तर नोटाला 524 मतदारांनी पसंती दर्शवली होती. शिवाय भाजप आणि शिवसेना वगळता इतर पक्षांच्या उमेदवाराची मताची झोळी ही रिकामीच राहिलेली आहे. गत निवडणुकीत येथील चित्र वेगळे राहिले असले तरी यंदा राज्याच्या राजकारणापासून येथील वार्डापर्यंतची राजकीय समीकरणे ही बदलेली आहेत. त्यामुळे कोणता पक्ष कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावरच येथील राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
अशा आहे मतांची गोळाबेरीज
>> अरुण दळवी (भाजपा)- 7300
>> देसाई सचिंद्र गणपत (मनसे)- 2772
>> खळे स्वप्निल मदन (बहुजन समाज पार्टी)- 144
>> अनिल सदाशिव कोकीळ (शिवसेना)- 13,410
>> सावंत प्रकाश रामकृष्ण (कॉंग्रेस) 1420
>> नोटा- 524