BMC Election 2022 : रमाई नगरात (135) कमी मतदार संख्या असल्याने उत्सुकता शिघेला, प्रमुख पक्षांना आव्हान अपक्षांचे
रमाई नगरातील या 135 क्रमांकच्या वार्डात 2017 च्या निवडणुकीत प्रमुख पक्षातील उमेदवारांबरोबर अपक्षांनीही आपले नशीब आजमावले होते. अपक्ष उमेदवार असलेल्या कैशाली रामकुमार वर्मा या विजयाच्या उंबरठ्यावर होत्या मात्र, इतर अपक्षांच्या मताचा प्रभाव त्यांच्यावर झाला आणि वार्जात शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली. त्यामुळे गतवेळी निसटता पराभव झालेला अपक्ष उमेदवार यंदा काय भूमिका निभावणार हे पहावे लागणार आहे.
मुंबई : (Mumbai) मुंबई महानगरपालिकेचा कमी मतदार संख्या असलेल्या प्रभागापैकी (Ramai Nagar) रमाई नगर हा एक आहे. क्षेत्राने कमी असला तरी येथील निकालावर सर्वांच्याच नजरा ह्या खेळून असतात. कारण इच्छूकांची बाहुगर्दीत कोण बाजी मारणार याचा अंदाज सहजासहजी काढता येत नाही आणि काढला तरी तो खरा होईलही असेही नाही. कारण 2017 च्या निवडणुकीमध्ये (Shivsena) शिवसेनेचे उमेदवार समिक्षा सक्रे यांचा अवघ्या 700 मतांनी विजय झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासमोर आव्हान राहिले आहे ते अपक्ष उमेदवार कैशाली रामकुमार वर्मा यांचे. त्यामुळे हा वार्डा लहान असला तरी येथील निकाल प्रमुख पक्षाला देखील विचार करायला भाग पाडत आहेत. 2017 च्या निवडणुकीत काटे की टक्कर झाली असली तरी यंदा काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उमेदवरांच्या गर्दीत मतांचे विभाजन
वार्ड क्रमांक 135 मध्ये 2017 निवडणुकीत 15 हजार 763 मतदारांनी हक्क बजावला होता. असे असताना 16 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवाय अपक्ष उमेदवारांना प्रमुख पक्षातील उमेदवारापेक्षा अधिकची मते मिळालेली आहेत. त्यामुळे हा प्रभाग निवडणुक पूर्वीपासून चर्चेत तर असतोच पण मताधिक्याबाबत भल्याभल्यांचे अंदाज फोल ठरवणारा मतदार संघ म्हणून याची ओळख आहे. या प्रभागात जातीची समीकरणे महत्वाची ठरत असून गतवेळी शिवसेनेच्या समिक्षा सक्रे यांचा अवघ्या 700 मतांनी विजय झाला होता.
महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)
Edit पक्ष | उमेदवार | विजयी / आघाडी |
---|---|---|
शिवसेना | सक्रे समिक्षा दिपक | विजयी उमेदवार |
समाजवादी पार्टी | चौधरी शाहीन फझलुर रहेमान | |
ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लीमीन | सुब्राती खतिजा बी बशीर अहमद | |
आरपीआय | पवार अश्विनी किसन | |
भाजपा | रिया योगेश बर्गे | |
अपक्ष/ इतर |
अपक्षांचा बोलबाला इच्छूकांची गर्दी
रमाई नगरातील या 135 क्रमांकच्या वार्डात 2017 च्या निवडणुकीत प्रमुख पक्षातील उमेदवारांबरोबर अपक्षांनीही आपले नशीब आजमावले होते. अपक्ष उमेदवार असलेल्या कैशाली रामकुमार वर्मा या विजयाच्या उंबरठ्यावर होत्या मात्र, इतर अपक्षांच्या मताचा प्रभाव त्यांच्यावर झाला आणि वार्जात शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली. त्यामुळे गतवेळी निसटता पराभव झालेला अपक्ष उमेदवार यंदा काय भूमिका निभावणार हे पहावे लागणार आहे.या वार्डात कमी मतदान झाल्याने मतदारांचा कौल कुणाकडे हे सांगता येत नाही. शिवाय गत निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला दोन नंबरची मते मिळालेली आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवाराकडून अधिक प्रयत्न केले जाणार प्रमुख पक्षातील उमेदवारच पुन्हा दावेदार होणार हे पहावे लागणार आहे.
असे आहे मताधिक्याचे गणित..!
> रिया योगेश बर्गे (भाजपा)- 1941
> मीना नरेंद्र बसके (अपक्ष)- 57
> चौधरी शाहीन फझलुर रहेमान (समाजवादी पार्टी)- 1362
> अश्विनी सतीश गायकवाड (बहुजन विकास आघाडी)- 160
> जयस्वाल पल्लवी सरोज(बहुजन समाज पार्टी)-850
> कुरमा बाबासाहेब काशीद (अपक्ष)- 386
> शोभाताई वसंत खिरवले (अपक्ष)- 339
> रुपाली निलेश पाटील (अपक्ष)- 234
> पवार अश्विनी किसन (आरपीआय)- 1315
> पेटकर सुरय्या शब्बीर (अपक्ष)- 1033
> सक्रे समिक्षा दिपक (शिवसेना)- 2804
> निर्मलादेवी वसंत सिंह (कॉंग्रेस)- 933
> सुब्राती खतिजा बी बशीर अहमद (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लीमीन)- 1701
> थोरात सुनंदा विजय (भारतीय शेतकरी कामगार पक्ष)- 317
> कैशाली रामकुमार वर्मा (अपक्ष)- 2103
> झरीना बेगम शाऊल हमीद (राष्ट्रवादी)- 155
>> नोटा – 73