BMC Election2022 Ward 4 : शिवसेनेच्या नगरसेविका मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या, सध्याचं चित्र अलबेल
वार्ड क्रमांक चार म्हणजे रावळपाडा तिथं मागच्या पाच वर्षापासून शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्याचं नाव पाटेकर सुजाता उदेश असं आहे. त्या दहिसर येथे राहतात. त्यांनी मागच्यावेळी झालेल्या निवडणुकीत 11078 मतं मिळविली होती. त्यावेळी त्यांनी इतर पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने पिछाडीवर ठेवलं होतं.
मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणुक (municipal corporation elections) अत्यंत चुरशीची होणार याचे संकेत आत्तापासून मिळायला सुरूवात झाली आहे. कारण राज्यसभा निवडणुकीत जे चित्र पाहायला मिळालं. त्यामध्ये भाजप (BJP) विरूद्ध महाविकास (MVA) जोरदार संघर्ष झाला. सकाळी सुरू झालेला संघर्ष अखेर रात्रीपर्यंत चालला. त्यामध्ये भाजपने त्यांचा सहावा उमेदवार निवडून आणला. काही दिवसांनी विधान परिषदेची निवडणुक देखील अशीचं पाहायला मिळेल असं वाटतं. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीला खरा रंग चढेल. सध्या भाजप आणि महाविकास आघाडीत आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु महापालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ही वेळ ठरवेल वार्ड क्रमांक 4 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्यावेळी तिथली निवडणुक चुरशीची झाली होती.
वार्ड क्रमांक चार म्हणजे रावळपाडा
वार्ड क्रमांक चार म्हणजे रावळपाडा तिथं मागच्या पाच वर्षापासून शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्याचं नाव पाटेकर सुजाता उदेश असं आहे. त्या दहिसर येथे राहतात. त्यांनी मागच्यावेळी झालेल्या निवडणुकीत 11078 मतं मिळविली होती. त्यावेळी त्यांनी इतर पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने पिछाडीवर ठेवलं होतं. त्या वार्डमध्ये एकून २३००६ मतदान आहे. त्यापैकी पाटेकर यांनी 11078 मतं मिळविली होती. त्यांच्या विरोधक आठ इच्छूक उमेदवार होते. परंतु त्यांनी सगळ्यांना पिछाडीवर ठेऊन आपला विजय निश्चित केला होता. विरोधक सध्या तिथं काम होत नाही अशी टीका करतात. परंतु खरंच नागरिक नाराज आहेत की नाही हे निवडणुकीच्या निकाला दिवशी समजेल.
पक्ष उमेदवार (Candidate) विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर