BMC Election 2022 Kajupada Ward 11 | काँग्रेस-भाजपाला धूळ चारणारी शिवसेनेची वाघीण यंदाही डरकाळी फोडणार का? काय आहे वॉर्ड क्रमांक 11 चं गणित?
मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीस सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते.
मुंबईः BMC Election2022 | ward 11 महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागले, तसं मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. मागील सहा महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध आपण अनुभवत आहोत. या सर्व राजकीय खलबतांचे पडसाद महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Mahapalika Election) मतदानावर दिसून येणार हे नक्की. या सर्वानंतरही मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 11चं गणितही तसंच आहे. मागील वेळी म्हणजेच 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेनं (ShivSena)हा वॉर्ड जिंकला. शिवसेनेच्या उमेदवार रिद्धी भास्कर खुरसंगे (Riddhi khursunge) यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. खुल्या प्रवर्गातून त्यांनी उमेदवारी लढवली होती. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करत रिद्धी खुरसंगे यांनी विजयी घोडदौड केली. त्यांनी भाजपचे प्रकाश दरेकर, काँग्रेसचे अशोक मेघाई यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राणे कृष्णाजी भाऊराव यांचा पराभव केला होता. आगामी महापालिका निवडणुकीत आता या वॉर्डात कोणत्या नगरसेवकाचं वर्चस्व असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 2017 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.
वॉर्डमधील महत्त्वाचा भाग कोणता?
बोरीवली भागातील दौलत नगर, श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर आणि काजूपाडा हा भाग वॉर्ड क्रमांक 11 मध्ये येतो. मागील वेळी शिवसेनेनं येथील मतदारांची मनं जिंकलेली दिसून आली. मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला एकतर्फी मतं दिली.
मतदार संघाचा टक्का काय?
मुंबई महापालिकेच्या वॉक्र क्रमांक 11 मध्ये 2011 मधील जनगणनेनुसार, एकूण लोकसंख्या 58 लाख ९९६ एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जाती 2156 तर अनुसूचित जमाती 886 एवढी आहे. हा मतदार संघ खुल्या प्रवर्गात सुटला आहे.
मागील निवडणुकीत काय घडलं?
मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीस सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. अपक्षांचीही संख्या कमी नव्हती. या सर्वांतून शिवसेनेच्या रिद्धी खुरसंगे यांनी बाजी मारली होती.
2017 मध्ये कुणाला किती मते?
- रिद्धी खुरसंगे- शिवसेना– 13,856
- राजेश कासार- मनसे 1143
- प्रकाश दरेकर- भाजपा– 7454
- अशोक मेघई यादव- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 1463
- कृष्णाजी राणे- राष्ट्रवादी– 322
- नोटा- 429
यंदा वॉर्ड आरक्षित की खुला?
यंदा 2022 च्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 11 खुल्या प्रवर्गात आला आहे. तसेच खुल्या गटातून महिला उमेदवारासाठी हा वॉर्ड राखीव आहे.
पक्ष (Party) | उमेदवार (Candidate) | विजयी/ आघाडी (Win) |
---|---|---|
शिवसेना | रिद्धी खुरसुंगे | - |
भाजप | प्रकाश दरेकर | - |
राष्ट्रवादी | कृष्णाजी राणे | - |
काँग्रेस | अशोक मेघई यादव | - |
मनसे | राजेश कासार | - |
अपक्ष/इतर | - | - |