BMC Election 2022 Ward 215 : अरुधती दुधवडकर यंदा गड राखणार? वॉर्ड क्रमांक 215 ची राजकीय परिस्थिती काय?

गेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा या ठिकाणी दारूण पराभव केला होता. शिवसेनेच्या अरुंधती दुधवडकर यांनी भाजपच्या मांजरेकर यांचा सहज पराभव केला होता. तर इतर राजकीय पक्षांनाही या ठिकाणी फार काही गवसलं नव्हतं. यावेळचं चित्र मात्र वेगळ आहे.

BMC Election 2022 Ward 215 : अरुधती दुधवडकर यंदा गड राखणार? वॉर्ड क्रमांक 215 ची राजकीय परिस्थिती काय?
अरुधती दुधवडकर यंदा गड राखणार?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 6:09 AM

मुंबई : यंदाची महापालिका निवडणूक (BMC Election 2022)ही चांगलीच गाजली आहे. मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना सत्ते ठाण मांडून आहे. मात्र यावेळी भाजपनेही निवडणुकांची तयारी जय्यत केली आहे. निवडणुकीच्या काळात भाजपने मुंबईत पोलखोल यात्रा काढून शिवसेनेच्या चुका जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला. मुंबईतील वॉर्ड नंबर 215 (Ward 215), ताडदेवची स्थितीही काहीशी अशीच राहिली आहे. या वॉर्डवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. यावेळी शिवसेनेसाठी (Shivsena) निवडणूक सोपी नसणार आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा या ठिकाणी दारूण पराभव केला होता. शिवसेनेच्या अरुंधती दुधवडकर यांनी भाजपच्या मांजरेकर यांचा सहज पराभव केला होता. तर इतर राजकीय पक्षांनाही या ठिकाणी फार काही गवसलं नव्हतं. यावेळचं चित्र मात्र वेगळ आहे.

नगरसेवक पदावरूनही वाद

मुंबईतील अनधिकृत बांधकामांप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्यावर काही आरोपही झाले होता. ताडदेवमधील अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय दुबे यांनी दुधवडकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी अरुंधती दुधवडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावरूनही बराच वाद रंगला होता. तसेच नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी त्यांनी बराच काळ उचलून धरली होती.

राजकीय पार्श्वभूमि

शिवसेना नेत्या अरुंधती दुधवडकर यांचे पती शिवसेनेचे माजी नगरसेवक अरुण दुधवडकर हे आहेत. महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करुन दुधवडकर दाम्पत्याकडून अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप या आरटीआय कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. तसेच असे आरोप गेल्या काही काळात अनेक नगरसेवकांविरोधात झाले आहेत. यापूर्वी संजय दुबे यांनी ताडदेवमधील दुधवडकर दाम्पत्याच्या अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिकेचा दरवाजा ठोठावला होता. मात्र तिथे त्यांना दाद न मिळाल्याने ते थेट न्यायलयात पोहोचले होते. मात्र त्यानेही दुधवडकर यांना फार फरक पडला नव्हता.

अशी आहे वॉर्डची हद्द

या वॉर्डमध्ये मोठा भूभाग हा समाविष्ठ होतो. वत्सलाबाई चौकातील पंडित मदन मोहन मालवीय मार्ग (तारदेव रोड) आणि केशवराव खाडये मार्ग (क्लार्क रोड) यांच्या जंक्शनपासून सुरू होणारी आणि केशवराव खाड्ये मार्गाच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडील मार्ग, पश्चिम रेल्वे लाईन्सच्या जंक्शनपर्यंत; तेथून पश्चिम रेल्वे मार्गाने दक्षिणेकडे फ्रेरे ब्रिज येथील मौलाना शौकतली रोड (ग्रँट रोड) पयंत; तेथून मौलाना शौकतअली रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे नाना चौकातील जावजी दादाजी मार्गापर्यंत; तेथून जावजी दादाजी रोड आणि पंडित मदन मोहन मालवीय रोडच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे केशवरो खाडये मार्गापर्यंत, हा वॉर्ड पसरलेला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.