राहुल, सोनिया गांधी डिसेंबरमध्ये मुंबईत! महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची महत्वाची बैठक, नेमकी काय चर्चा?

आज मुंबईत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास 50 मिनिटे आगामी महापालिका निवडणुकांवर चर्चा झाल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुंबईतील अनेक विषय, वचननामा आदीबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

राहुल, सोनिया गांधी डिसेंबरमध्ये मुंबईत! महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची महत्वाची बैठक, नेमकी काय चर्चा?
मुंबई काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 7:44 PM

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबईत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास 50 मिनिटे आगामी महापालिका निवडणुकांवर चर्चा झाल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुंबईतील अनेक विषय, वचननामा आदीबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी 28 डिसेंबर या काँग्रेसच्या स्थापना दिली मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभा घेणार असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली आहे. (Important meeting of Mumbai Congress on the backdrop of municipal elections)

महत्वाची बाब म्हणजे आज झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत एकत्र निवडणुकांबाबत चर्चा झाली नाही. प्रामुख्यानं मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. आज निवडणुकीबाबत चर्चा झाली असली तरी आघाडी कुणाशी करावी का? याबाबत चर्चा झाली नसल्याचं पाटील यांनी आवर्जुन सांगितलं. केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत का करत नाही? महाराष्ट्रात पूर परिस्थिती गंभीर असताना पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह कुठे आहेत? त्यांनी महाराष्ट्राचा दौरा का केला नाही? असे सवाल एच. के. पाटील यांनी विचारले आहेत.

‘निवडणूक एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाली नाही’

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली नाही. मुंबईतील प्रश्नांबाबत आज्या बैठकीत चर्चा झाली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असं थोरात म्हणाले. त्याचबरोबर राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकादरम्यानची भाषणं आम्हाला आजही लक्षात आहेत. राज ठाकरे त्यांच्या भूमिकेपासून लांब जाणार नाहीत, असा टोला थोरात यांनी यावेळी लगावला.

‘महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठाम निर्णय’

दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय ठाम आहे. 227 जागांवर आम्ही जिंकू शकत नाही. मात्र, कार्यकर्त्यांची इच्छा आणी मागणी आहे, असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस आरक्षणाच्या बाबतीत बोलत आहेत ते वक्तव्य दिशाभूल करणारं आहे. हा संवेदनशील विषय आहे. फडणवीसांनी चुकीची भाषा बोलू नये. देवेंद्र फडणवीस आठवड्यात दिल्लीला दोनदा जाऊन मुजरा करतात, असा टोलाही भाई जगताप यांनी लगावला आहे.

इतर बातम्या :

BREAKING : आशिष शेलार-अमित शाहांची दिल्लीत भेट, आता फडणवीस-चंद्रकांत पाटील तातडीने दिल्लीला जाणार?

Maratha Reservation : ‘आधी अधिकार नाही म्हणून ओरडायचे, आता अधिकार दिले तर काय फायदा म्हणतात!’, मेटेंचा चव्हाणांवर हल्लाबोल

Important meeting of Mumbai Congress on the backdrop of municipal elections

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.