सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐकण्यासाठी मी उत्सुक, जे घडेल ते…; अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयकडे सर्वांचं लक्ष
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणीची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यावर खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद सावंत यांनी नेमकं काय म्हटलं?
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. जे काय घडलेलं आहे. ते उभ्या महाराष्ट्राला संपूर्ण देशाला माहिती आहे. हे सगळं संविधानिक आहे. यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय याच्यावर आधीच प्रचंड ताशेरे उरलेले आहेत. अरुणाचल प्रदेशाचा निर्णय हा तुमचा पुढे उदाहरण असला पाहिजे त्या ठिकाणी तोही निर्णय सर्वोच्च न्यायालयात देऊन टाकला होता आणि पुन्हा जुन्या मुख्यमंत्र्यांना बसवलं होतं. महाराष्ट्राच्या राजकीय पेचावरही असाच निर्णय येऊ शकतो, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.
मला जर एवढाच कळतं जर ते लोक निर्णय देणार असं म्हणत असतील. तर ज्यांनी तुम्हाला अध्यक्ष म्हणून बसवलं ते जर उद्या अपात्र झाले तर तुम्ही पात्र कसे हे असं सांगा. त्यावेळी चे उपाध्यक्ष कोण होते त्यांनी निर्णय दिलेला असेल तर आम्ही समजू शकतो. परंतु त्यावेळी हे अध्यक्ष नव्हते, असं म्हणत अरविंद सावंत यांनी यावर राहुल नार्वेकर यांना टोला लगावला आहे.
राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया काय?
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या निकालाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. कोर्ट जी ऑर्डर देणार त्या ऑर्डरचं देशातील नागरिक पूर्ण सन्मान करणार. जो व्यक्ती संविधानावर लोकशाहीवर विश्वास ठेवतो तो संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवरही विश्वास ठेवतो, असं नार्वेकर म्हणालेत.
केंद्र सरकारवर निशाणा
काल मणिपूरमध्ये काय झालंय. त्यानंतर कुस्तीपटू बसलेले आहेत. आमचे दिल्लीमध्ये कर्नाटकात या ठिकाणी फिरत आहेत आणि बेटी बचाव असा संदेश देत आहेत. परंतु दिल्लीला मुली आंदोलनाला बसलेल्या आहेत यांचं त्यांना काहीच नाही, असं म्हणत अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.