खेकड्यांना जपलं असतं तर…; उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांचं उत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरे अकार्यक्षम मुख्यमंत्री, न्याय दिला नाही; शिवसेनाच्या आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
मुंबई | 25 जुलै 2023 : ‘आवाज कुणाचा’ या शिवसेना ठाकरे गटाच्या मुलाखत सत्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत होणार आहे. या मुलाखतीचा टीझर प्रकाशित झाला आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना- शिंदेगटावर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्याला आता शिवसेनेच्या आमदारांनी उत्तर दिलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
मुलाखतीदरम्यान तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार वाहून गेलं…, असा सवाल संजय राऊतांनी विचारला त्यावर सरकार वाहून गेलं नाही. तर खेकड्यांनी ते पोखरलं, असं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. या टीकेला आता गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
गुलाबराव पाटलांचं उत्तर
आम्हाला खेकडा म्हणता तर म्हणा. पण लक्षात ठेवा खेकडाच कावीळवर योग्य पर्याय ठरतो. या खेकड्यांना जपलं असतं तर शिवसेना फुटली नसती, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला आहे.
बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाताय ही चांगली बाब आहे. आम्हाला एक कळत नाही आमचा दोष काय होता? आता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावं लागेल… तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा काय?, असा प्रतिसवाल गुलाबराव पाटलांनी केली आहे.
तर आमदार संजय शिरसाट यांनीही ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला न्याय दिला नाही, म्हणून उठाव झाला, असं संजय शिरसाट म्हणालेत.
आमदार संजय गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे अकार्यक्षम मुख्यमंत्री होते, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर
उद्धव ठाकरे यांची उद्या एक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यात संजय राऊत त्यांची मुलाखत घेणार आहेत. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिली आहेत.
भाजप म्हणतं की तुम्ही पाठीत खंजीर खुपसला, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला तेव्हा मी जर खंजीर खुपसलं, असं म्हणता मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं? तुम्ही राष्ट्रवादी पक्ष का फोडला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत!
“आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!”
आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | भाग ४ | प्रोमो – Shivsena Podcast Part 4 – Promo
सहभाग: माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
निवेदकः श्री. संजय राऊत, खासदार व कार्यकारी संपादक – सामना
भाग… pic.twitter.com/5critjy6V6
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 24, 2023