AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक आदेश आला अन् नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांचे ‘सुरक्षारक्षक’ झाले!; लोणावळ्याच्या बंगल्यातील ‘तो’ प्रसंग

Narayan Rane Facebook Post About Balasaheb Thackeray Smrutidin : साहेबांवर माझं प्रेम आणि निष्‍ठा होती, ती अशी... शेवटी ते माझे गुरु होते, पितृतुल्‍य होते... साहेबांना मनापासून श्रध्‍दांजली!; बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने नारायण राणे भावूक, वाचा सविस्तर...

एक आदेश आला अन् नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांचे 'सुरक्षारक्षक' झाले!; लोणावळ्याच्या बंगल्यातील 'तो' प्रसंग
| Updated on: Nov 17, 2023 | 11:11 AM
Share

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त शिवतीर्थवर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. तर सोशल मीडियावरही बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नारायण राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक… 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात शिवसेना पक्षाकडून ते राज्याचे मुख्यमंत्रीदेखील राहिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्म-तीदिनानिमित्त त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. यात त्यांनी मातोश्रीवर हल्ल्याच्या धमकीचा उल्लेख केला आहे. तसंच यावेळी आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या संरक्षणासाठी पुढे आल्याचंही नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

नारायण राणे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

असे प्रेम आणि विश्‍वास पुन्‍हा मिळेल काय?

असे साहेब पुन्‍हा होणे नाही!

साहेब या जगातून निघून गेल्‍याला आज 11 वर्षे पूर्ण झाली. साहेब नाहीत यावर आज सुध्‍दा विश्‍वास बसत नाही. ‘’झंझावात’’ या माझ्या आत्‍मचरित्रातील साहेबांची एक आठवण आजच्‍या दिवशी सगळ्यांनी वाचावी ही नम्र विनंती.

…..पवारांनी उध्‍दवजींना सावध केलं की, मातोश्रीवर बॉम्‍बहल्‍ला करण्‍याचा कट शिजल्‍याची पक्‍की खबर येत असून त्‍यासाठी अतिरेकी मुंबईत पोहोचलेदेखील आहेत! पण, पवारांच्‍या काळजीचं कारण वेगळंच होतं. त्‍यांच्‍या मते, या कटात चक्‍क काही घरभेदी सामील होते! साक्षात मातोश्रीच्‍या आतल्‍या गोटातले घरभेदी! त्‍यांना साथ होती राज्‍याच्‍या पोलीस दलातल्‍या आणि गृहमंत्रालयातल्‍या सूर्याजी पिसाळाच्‍या अवलादींची!! पवारांनी सांगितलं की, हा हल्‍ला परवाच्‍या दिवशी होणार आहे. त्‍यांनी उध्‍दवजी यांना पोलीस बंदोबस्‍त वाढवण्‍याबद्दल विचारणा केली आणि त्‍यांना सावधगिरीचा सल्‍ला दिला की, ही बातमी ठाकरे कुटुंबाव्‍यतिरिक्‍त बाहेर कळता कामा नये.

या बातमीनं सुन्‍न झालेल्‍या उध्‍दवजी यांनी तातडीने यावर साहेबांशी बराच वेळ चर्चा केली. बाळासाहेबांनी घरातल्‍या प्रत्‍येक सदस्‍याला सुरक्षित ठिकाणी निघून जाण्‍याचा आणि काही दिवस ‘मातोश्री’ पासून दूर राहण्‍याचा आदेश दिला. त्‍यांनी सर्वांना असा सल्ला दिला की, कुणालाही एकमेकांच्‍या या ठावठिकाण्‍याबद्दल कसलीच कल्‍पना असता कामा नये. मग, दुस-याच दिवशी साहेब आपली पत्‍नी श्रीमती मीनाताई आणि त्‍यांचा विश्‍वासू सेवक थापा यांच्‍यासमवेत त्‍यांच्‍या मित्‍सुबिशी पजेरो गाडीने लोणावळयाकडे निघाले. बाळासाहेबांसाठी त्‍या काळात एकच सुरक्षित ठिकाण होतं आणि ते म्‍हणजे लोणावळा. लोणावळयाला निघण्‍यापूर्वी साहेबांनी मला मातोश्रीवर बोलाविले. त्‍यांनी मला विचारले, काय करतोस? कुठे जाणार आहेस काय? उद्या सकाळी तू तुझा फौजफाटा घेऊन मातोश्रीवर ये. कुठे जायचे ते मी सकाळी सांगेन. माझ्या गाडीमागे यायचं काहीही विचारायचं नाही. मी म्‍हणालो, ठीक आहे साहेब. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मातोश्रीवर पोहोचलो.

मी येताच साहेबांची गाडी कलानगरातून बाहेर पडली. तिथून ती सरळ लोणावळ्याला एका बंगल्‍याजवळ जाऊन थांबली. त्‍या बंगल्‍याच्‍या आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्‍त लागलेला होता. साहेब त्‍या बंगल्‍यात थांबले. त्‍या बंगल्‍याच्‍या समोरच्‍या बंगल्‍यात आम्‍हा शिवसैनिकांची आणि पोलिसांची राहण्‍याची व्‍यवस्‍था होती. रात्री साहेबांनी मला बोलावून घेतले आणि विचारले की, व्‍यवस्‍था चांगली झाली आहे काय? मी ‘होय’ असे सांगितले. तो डिसेंबरचा उत्‍तरार्ध असल्‍यामुळे थंडी मोठया प्रमाणावर होती.

रात्री २ वाजताच्‍या सुमारास मॉंसाहेब गॅलरीत आल्‍या. त्‍यांनी पाहिलं की, आम्‍ही चार जण एका गाडीमध्‍ये बंगल्‍याच्‍या समोरच बसलो आहोत आणि गाडीच्‍या बाहेर शेकोटी पेटविलेली आहे. त्‍यांनी वरुनच विचारले, ‘काय राणे, झोप येत नाही काय?’ मी म्‍हणालो, ‘नाही. मॉंसाहेब, आम्‍ही जागतो आहोत.’ त्‍यानंतर, त्‍यांनी चहा वगैरे काही पाहिजे का, अशी विचारणा केली. मी ‘नाही’ म्‍हणालो, तेवढ्यात, साहेब पण बाहेर गॅलरीत आले. त्‍यांनी आमची विचारपूस केली आणि जेवण झाले काय, याचीही चौकशी केली. त्‍यानंतर मॉंसाहेब आणि साहेबसुध्‍दा आत गेले.

मारेकऱ्यांनी आमचा माग काढला असेल किंवा नसेल. पण, मला नशिबावर हवाला ठेवून चालणार नव्‍हतं. या सुरक्षारक्षकांचा काय भरवसा, कोण कधी फिरेल, काही सांगता येतं? धोका फार मोठा होता. साहेबांच्‍या सुरक्षिततेसाठी आम्‍हा शिवसैनिकांना संपूर्ण रात्र डोळ्यांत तेल घालून उभं राहावं लागणार होतं.

साहेबांवर माझं प्रेम आणि निष्‍ठा होती, ती अशी. शेवटी ते माझे गुरु होते, पितृतुल्‍य होते…

साहेबांना मनापासून श्रध्‍दांजली!

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.