राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन महत्वाचे प्रस्ताव; कुणाच्या नावासाठी आग्रह? पाहा…
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या बैठकीचा एक्सक्ल्युझिव्ह व्हीडिओ; राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडतंय?
मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचा निर्णय होतोय. राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडतेय. यात दोन प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन प्रस्ताव मांडले आहेत. पहिला म्हणजे शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तर शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावेत, असा दुसरा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला आहे.
प्रस्ताव फेटाळला
शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीचा एक्सक्ल्युझिव्ह व्हीडिओ
राष्ट्रवादीच्या कार्यालयातील बैठकीचा एक्सक्ल्युझिव्ह व्हीडिओ टीव्ही 9 मराठीने प्रसारित केला. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, फौजिया खान, वंदना चव्हाण, सोनिया दुहन यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
कार्यकर्ते आक्रमक
मुंबईतील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडतेय. राष्ट्रवादीच्या कार्यलया बाहेर राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते जमले आहेत. हे सगळे लोक शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. आम्हाला केवळ शरद पवार हेच अध्यक्ष हवे आहेत, अशी मागणी हे नेते करत आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न
शरद पवार हेच राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदी राहावेत, या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी एका कार्यकर्त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत एका कार्यकर्त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला वेळीच रोखलं त्यामुळे अनर्थ टळला.