संजय राऊत यांना खोटं बोलण्याची सवय, याचा परिणाम शिक्षेत दिसणार; शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊतांवर घणाघात, मुंबईतील विकास आणि एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाची पद्धत; शिवसेनेच्या नेत्याची सविस्तर प्रतिक्रया
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघात केलाय. संजय राऊत यांना खोटं बोलण्याची सवय आहे. त्या सवयीचा परिणाम त्याच्या शिक्षेत दिसून येईल. त्यांना शिक्षा मिळणारच, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं म्हणजे हा सगळा आमदारांचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर हक्कभंग आणलेला आहे, असंही ते म्हणालेत.
संजय राऊतांवर घणाघात
संजय राऊत काय भाषा. काय ती वक्तव्य.. स्टेटमेंट आहेत की शिव्या देतो… खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याची शिक्षा भोगायची वेळ आली आहे. त्यावेळेस सगळे माफीचा साक्षीदार होण्याचे प्रयत्न करतात. तेव्हा माफी नाहीतर शिक्षा होऊ शकते हे त्याला कळलेलं आहे. त्यामुळे रिवर्स गिअर टाकण्याचा संजय राऊतचा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघातही शिरसाटांनी केला आहे.
विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं म्हणजे हा सगळा आमदारांचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर हक्कभंग आणलेला आहे, असंही ते म्हणालेत.
आमचं काम जनतेसमोर आहे. तसं संजय राऊत कोण आहे? भ्रष्टाचारप्रकरणी संजय राऊत यांनी जे पी नड्डाकडे पुरावे देऊ नये तर कोर्टाकडे जावं. नाहीतर ते भ्रष्टाचाराचे आरोप हे जे पी नड्डा करतील. त्याऐवजी कोर्टाकडे जावं आमचं त्यांना खुला आव्हान आहे. कॅगचा अहवाल आलेला आहे. मुळात भ्रष्टाचारी कोण आहे, जनतेला माहीत आहे, असं चॅलेंज शिरसाट यांनी दिलं आहे.
राज्यमंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत प्रश्न विचारला असता शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.कुठलेच भीती नाही निवडणूक आयोगाने जो न्याय द्यायचा तो दिला आहे. शिंदे आणि फडणवीस यांना जेव्हा वाटेल योग्य वेळ पाहून कॅबिनेटचा विस्तार होईल, असं ते म्हणालेत.
मिठी पावसाळापूर्वीच का साफ केली जाते. ही मिठी नदी प्रायव्हेट लोकांचे प्रॉपर्टी झाली होती. पण आता तसं राहिलेलं नाही म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधी मिळते आणि ते तिथं जात आहेत. या प्रायव्हेट प्रॉपर्टीत घुसायला कुणाला एन्ट्री नव्हती. म्हणून आज मुख्यमंत्री त्या मिठी नदीला भेट देत आहेत. आमचं सरकार मिठी नदीचा प्रश्न कायमचा सोडवणार आहोत. यापुढे मिठी नदी ओसंडून वाहताना दिसेल, असा शब्द शिरसाटांनी दिलाय.
शिरसाटांच्या टीकेला उत्तर
संजय शिरसाट यांच्या टीकेला ठाकरे गटाचे कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांनी उत्तर दिलं आहे. संजय शिरसाट हे एवढी वर्षे उद्धव ठाकरे यांच्यामुळे, ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारामुळे 3 वेळा निवडून आले. जर त्यांना भाजपच्या हिंदुत्व एवढं आवडत असेल तर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा पलटवार वैभव नाईक म्हणाले आहेत.