संजय राऊत म्हणजे घरफोडे, त्यांच्या बोलण्याला शून्य किंमत; शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात

Sanjay Shirsat On Sanjay Raut : आधी उद्धव ठाकरे यांचं घर फोडलं आता पवारांचं घर फोडण्याचे प्रयत्न सुरू; शिवसेनेच्या नेत्याचं संजय राऊतांवर टीकास्त्र

संजय राऊत म्हणजे घरफोडे, त्यांच्या बोलण्याला शून्य किंमत; शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 4:25 PM

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत यांनी कुठेही जाऊन भाषण केलं आणि कुठेही आपलं मत मांडलं तरी त्यांच्या बोलण्याला शून्य किंमत आहे. संजय राऊत आधी घरफोडी करायचे. पण आता हा नवीन डाकू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेला आहे. आधी उद्धव साहेबांचं घर फोडलं आणि आता शरद पवार साहेबांचं घर फोडण्याच्या मार्गावर ते आहेत”, अशा शब्दात शिरसाट यांनी घणाघात केला आहे.

आताच्या पत्रकार परिषदेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: सांगितलं की, मी मंत्रालयात जायचो नाही. खोटारडेपणाचा कळस हा संजय राऊत आहे. दरवेळेला खोटं बोलून माणसांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं आहे. बेताल वक्तव्य करून राजकारणामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल आणि सगळे एकमेकांकडे कसे संशयाने पाहतील, हे एकमेव ध्येय त्यांचं सध्या आहे. त्यांची हीच वक्तव्य उद्धव साहेबांना घातक ठरणार आहे आणि पक्ष संपत आलेला आहे, असं शिरसाट म्हणाले आहेत.

कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षाचा अपमान कराल आणि पुढील जाल तर तसं नसतं. महाविकास आघाडी ही टिकणार नाही, हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. पुढची वज्रमूठ सभा पुढे ढकललेली आहे. असं त्यांनी सांगितलं पण ही सभा आता कधीच होणार नाही. महाविकास आघाडीचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही हे भाकीत सत्यात उतरणार आहे, असंही शिरसाट म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते थोडीच शिवसैनिक आहेत. तुमचा सल्ला ते मान्य करायला. त्यांचे सल्ले सगळं मान्य करतात. तुम्ही त्यांना सल्ले द्यायच्या भानगडीत पडू नका, असं म्हणत शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

शरद पवार यांच्या पुस्तकातील उल्लेखावर शिरसाट बोलले आहेत. शरद पवारांच्या बोलण्याला एका अर्थाने उद्धव ठाकरे यांनी संमती दिलेली आहे. मी कुठे गेलोच नव्हतो हे त्यांनी मान्य केलेला आहे. मी काही काम केले नाही हे देखील त्यांनी आता मान्य केलेलं आहे. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेते जेव्हा पुस्तक लिहितो. त्यावेळेला त्यांनी दाव्यासकट अनुभवाअंती लिहितात, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.