तुम्हीच आमचे नेते, अध्यक्षपदावरून निवृत्त होऊ नका; शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह
Sharad Pawar on NCP Presidency : महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार-शरद पवार!; निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणा
मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होतोय, अशी घोषणा शरद पवार यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली.तुम्हीच आमचे नेते, तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्त होऊ नका, अशी भावनिक साद या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घातली. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार-शरद पवार!, देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशा घोषणा देण्यात येत आहेत.
अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय
शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचं आज प्रकाशन झालं. यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पाय उतार होण्याची घोषणा केली आहे. मी अध्यक्षपदावरून निवृत्त होतोय, असं शरद पवार म्हणालेत.
कार्यकर्ते भावूक
शरद पवार यांच्या निवृत्तीतच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सगळेच नेते-कार्यकर्ते भावूक झाले. तुम्ही असा निर्णय घेऊ शकत नाही. हा निर्णय तुम्ही मागे घ्या. जोवर तुम्ही निर्णय मागे घेत नाही तोवर आम्ही सभागृह सोडणार नाही, असं कार्यकर्ते यावेळी म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
संजय राऊत यांचं ट्विट
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत, असं राऊत म्हणालेत.
एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि… pic.twitter.com/YwVVgrrWiN
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2023
शरद पवार काय निर्णय घेणार?
शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.