Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोतवाल, इसाप आणि नवा राजा; सामनाच्या ‘रोखठोक’मधून नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात

Saamana Editoal on PM Naredra Modi : कविता अन् इतिहासाचा दाखला देत सामनाच्या 'रोखठोक'मधून नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

कोतवाल, इसाप आणि नवा राजा; सामनाच्या 'रोखठोक'मधून नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 8:22 AM

मुंबई : सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला आहे. इसाप, इतिहास आणि कवितेचा संदर्भ देत ‘रोखठोक’ सामनातून नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. सध्याचा हा अमृत काळ आहे. यात ढोल वाजवला जातोय, पण सध्या देश बुडत असल्याचं सामनात म्हणण्यात आलं आहे. कवी सदानंद रेगे यांच्या कवितेच्या आधारे मोदींच्या कामकाजाच्या पद्धतीवर निशाणा साधण्यात आला आहे.

‘रोखठोक’ सदर जशास तसं

आपण नक्की कोठे चाललो आहोत? असा प्रश्न तेव्हा इसापला पडला होता. तो प्रश्न मोदी काळातही कायम आहे. सध्याचा काळ हा अमृतकाळ असल्याचा ढोल वाजवला जातो, पण देश कसा बुडत आहे, देश कसा जळत आहे ते रोज दिसते. महाराष्ट्रातील लेखक-कवींनी 40-50 वर्षांपूर्वीच आजच्या स्थितीचे वर्णन करून ठेवले होते.

आजची भारताची परिस्थिती अगदीच विचित्र आहे. कुणीच सांगू शकत नाही की आपण कुठे जात आहोत? इसापची एक कथा मला आठवते. इसाप हा गुलाम होता. गुलाम असल्यामुळे तो उघडपणे बोलू शकत नव्हता. एकदा इसाप गावातून खाली मान घालून जात असताना कोतवालाने त्याला हटकून विचारले, ‘तू कोठे चालला आहेस?’ इसापने उत्तर दिले, ‘मला माहीत नाही!’ त्यावर कोतवाल भडकला व इसापची गचांडी पकडून म्हणाला, ‘अच्छा, चल तुला तुरुंगात नेऊनच डांबून टाकतो!’ तुरुंगाच्या वाटेवरच इसाप कोतवालाकडे पाहत म्हणाला, ‘कोतवालसाहेब, मी कुठे जाणार ते मलाच माहीत नव्हते हे पटले ना! मी खरेच बोलत होतो ना? पण गुलामाचं कोण ऐकतंय?’ इसापच्या या बोलण्यावर कोतवाल निरुत्तर झाला. देशाची अशीच परिस्थिती आहे.

न्यायपत्रे कोण लिहिणार!

आजच्या परिस्थितीचे यथार्थ चित्रण मराठी लेखक व कवींनी फार पूर्वीच करून ठेवले. तेव्हा त्यांना हेदेखील माहीत नसावे की, भविष्यात एक ‘मोदी युग’ अवतरणार आहे. नंतरच्या काळात कवितेत रमलेले कथालेखक सदानंद रेगे यांच्या कवितेचे प्रतिभा विश्व हे जबरदस्त होते. श्री. रेगे यांनी न्यायव्यवस्थेच्या घरासमोर घातलेली ही रांगोळी पहा –

“यापुढे आम्हीच तुमची

न्यायपत्रे लिहीत जाऊ

तुम्ही फक्त तुमचा अंगठा

तेवढा मुकाट पुढे करावयाचा

नि आमच्या हातावरचं रक्त

लावून राजस मुद्रा ठोकायची

एवढं कबूल करा न्यायमूर्ती

तुमच्या दारापुढे रोज रामप्रहरी

आम्ही राखेची रांगोळी काढू….

राखेला इथे काय तोटा?”

आजचे चित्र या कवितेपेक्षा अजिबात वेगळे नाही. न्यायपत्रे सत्ताधारी लिहितात व त्यावर फक्त मोहोर उठवली जाते. पैसा आणि सत्ता हाच काही लोकांच्या जीवनाचा केंद्रबिंदू झाला.

असा हा राजा

मंगेश पाडगावकर यांनी ‘राजा’ ही कविता 1990 साली प्रसिद्ध केली. त्यावेळी देशात लोकशाहीचा बोलबाला होता व मोदी-शहा हे भविष्यात सत्ताधारी होतील याची सुतराम शक्यता नव्हती, पण ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ हे सदानंद रेगे व मंगेश पाडगावकर यांनी सिद्ध केले. पाडगावकर यांची ‘राजा’ ही कविता मी त्यांच्या तोंडून अनेकदा ऐकली, पण 30 वर्षानंतर असा एखादा राजा देशाच्या नशिबी येईल असे तेव्हा वाटले नव्हते.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.