KCR यांचंही ‘मिंधे’ मॉडेल, महाराष्ट्रात पैशांचा नवा खेळ; सामनातून BRSवर घणाघात

Saamana Editorial on K Chandrashekar Rao : आधी भाजपचा कडाडून विरोध अन् आता हातमिळवणी, केसीआर यांचा यू-टर्न; सामनातून बीआरएसवर टीकास्त्र

KCR यांचंही 'मिंधे' मॉडेल, महाराष्ट्रात पैशांचा नवा खेळ; सामनातून BRSवर घणाघात
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 7:57 AM

मुंबई : BRS पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय झाला आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी BRS मध्ये प्रवेश केला आहे. आषाढी एकादशीच्या आधी केसीआर 600 गाड्यांच्या ताफ्यासह महाराष्ट्रात आले. त्यांनी पंढरपूरमध्ये जात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. तुळजाभवानीसमोर नतमस्तक झाले. केसीआर यांच्या दौऱ्यावर आणि राज्याच्या राजकारणातील एन्ट्रीवर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. रोखठोक या सदरातून केसीआर यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

सामनाचं रोखठोक सदर जसंच्या तसं

महाराष्ट्राच्या राजकारणात तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा ताफा घुसवला आहे. कालपर्यंत हेच के.सी.आर घोर भाजपविरोधी म्हणून उभे होते. मोदी यांच्या विरोधात वज्रमूठ उभी करण्यासाठी ते देशात फिरले.. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व शरद पवार यांना भेटून गेले. त्याच महाशयांनी आता ‘यू टर्न घेतला आहे. ते महाराष्ट्रात घुसत आहे ते भाजपच्या मदतीसाठीच!

महाराष्ट्राचे राजकारण हा एकेकाळी पुरोगामी विचारांचा भुईकोट किल्ला होता. बाहेरच्या विचारांचे कीटक येथे घुसत नव्हते. आता महाराष्ट्राची अवस्था कोसळत चाललेल्या किल्ल्यासारखी झाली आहे. अमित शहांपासून तेलंगणाच्या के. चंद्रशेखर रावांपर्यंत जो उठतोय तो महाराष्ट्राचे सत्ताकारण व अर्थकारण ताब्यात घेऊ इच्छितो. महाठी राज्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षविस्तारासाठी महाराष्ट्राची भूमी निवडली. मराठवाडा, विदर्भ, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाची मोठया प्रमाणात प्रसिद्धी मोहीम राबवली जात आहे. पैशांच्या बाबतीत ते महाराष्ट्रातील शिंदे गट व भाजपास टक्कर देत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी एक विधान केले, ‘चंद्रशेखर राव यांनी आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’ दिली आहे! ‘ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणी यायचे हे आता श्री. राव ठरवू लागले. प्रकाश आंबेडकर व राव यांच्यातही भेटीगाठी झाल्या. महाराष्ट्रातील अडगळीत गेलेले अनेक जण के. सी. आर. यांच्या पक्षात सामील झाले.

के. सी. आर. चार दिवसांपूर्वी तेलंगणातून 600 गाडय़ांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात आले. पंढरपुरात त्यांनी श्री विठोबा माऊलीचे दर्शन घेतले. पंढरपूरचे एक तरुण नेते भालके यांनी के. सी. आर. यांच्या पक्षात प्रवेश केला. त्या कार्यक्रमात राव यांनी जे भाषण केले ते तेलंगणातील शेतकऱ्यांच्या सुखसमृद्धीचे वर्णन करणारे होते. जे तेलंगणास जमले ते महाराष्ट्राला का जमू नये ? असा सवाल त्यांनी केला!

मुख्यमंत्रीपदी श्री. उद्धव ठाकरे असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. के. सी. आर. हे ‘वर्षा’ बंगल्यावर आले होते व त्यांनी श्री. ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. वर्षा बंगल्याच्या हिरवळीवर राव व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी भोजन व्यवस्था होती. राव यांनी तेव्हा तेलंगणातील शेतकऱ्यांची स्थिती आपण कशी सुधारली त्या योजनांची माहिती दिली. पीक विमा योजनेपासून इतर सर्व योजना त्यांनी सांगितल्या. देशातील सर्व प्रमुख पक्षांनी मोदी यांच्या एकाधिकारशाहीविरुद्ध एकत्र आले पाहिजे व त्याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी म्हणून आपण येथे आलो, असे ते त्यावेळी म्हणाले होते.

आपल्याला कोणतीही मोठी महत्त्वाकांक्षा नाही, पण 2024 साली दिल्लीत परिवर्तन व्हावे यासाठी आपण देशात फिरू, असेदेखील ते म्हणाले होते आणि त्यांच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता. राव हे महाराष्ट्र भेटीत शरद पवार यांना भेटले. पुढच्या काळात ते नितीशकुमार, केजरीवाल, ममता बॅनर्जी यांनाही भेटले. पण त्यावेळी विरोधी आघाडीसाठी शड्डू ठोकून उभे राहणारे के. सी. आर. आज दुसऱ्या टोकाला उभे आहेत व अप्रत्यक्षपणे ते मोदी यांनाच मदत करीत आहेत…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.