मागच्या दीड महिन्यापासून जीव मुठीत धरून जगणारे ‘हिंदू’ नाहीत का?; सामनातून मोदींना सवाल

Saamana Editorial on Manipur Violence : तो नरसंहार दिसत नाही का? ते 'हिंदू' नाहीत का?; सामनातून पंतप्रधान मोदींसह भाजपला सवाल

मागच्या दीड महिन्यापासून जीव मुठीत धरून जगणारे 'हिंदू' नाहीत का?; सामनातून मोदींना सवाल
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 7:46 AM

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मणिपूरमध्ये होत असलेल्या हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे. हिंसाचारात जळणाऱ्या मणिपूरची जनता दीड महिन्यापासून जीव मुठीत धरून जगते आहे आणि देशाचे पंतप्रधान या गंभीर संकटाविषयी चकार शब्दही बोलत नाहीत . मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांच्या हल्ल्यात हिंदू मरत आहेत आणि नकली हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे तथाकथित महाशक्तीचे सरकार डोळे मिटून हा रक्तपात पाहत आहे . देशभरात हिंदू जनआक्रोश मोर्चे काढणाऱ्या सरकार पक्षाला मणिपुरातील हिंदूंचा नरसंहार दिसत नाही काय ? मणिपूरचा हिंदू ‘ हिंदू ‘ नाही काय ?, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

मणिपूर हे राज्य हिंदुस्थानचा भाग नाही, असे केंद्रीय सरकारला वाटते आहे काय? गेल्या दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये खुलेआम कत्तली व रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत 115 हून अधिक लोक मणिपूरमध्ये पेटलेल्या जातीय वणव्यात मृत्युमुखी पडले. 400 हून अधिक लोक या हिंसाचारात जखमी झाले. जिवाच्या भीतीने हजारो नागरिकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

गुरुवारी तर हिंसक जमावाने केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आरके रंजन सिंह यांचे इंफाळमधील निवासस्थानच पेटवून दिले. त्यावेळी मंत्रिमहोदय सुदैवाने घरात नव्हते आणि इतरही कोणाला दुखापत झाली नाही. तथापि, मणिपूरमधील हिंसाचाराची मजल आता केंद्रीय मंत्र्यांचे निवासस्थान जाळण्यापर्यंत गेली याचा अर्थ काय? खुद्द आरके रंजन सिंह यांनीही मणिपूरमधील हिंसक घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे. तरीही केंद्रातील सरकार ढिम्मच राहणार आहे का?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री मणिपूरच्या दौऱ्यावर गेले असता हिंसाचार व दंगलींचे सारे खापर न्यायालयावर फोडून त्यांनी हात झटकले. देशातील जनतेच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी गृहखात्याची आहे याचेही भान सरकारला राहिलेले नाही. शिवाय, ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ले सुरू आहेत, ते पाहता हा सगळा हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग असावा असे दिसते, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

राज्य व केंद्रातही भाजपची सत्ता असताना मणिपूर का पेटले? ‘डबल इंजिन’चे सरकार तिथे फेल का झाले व अजूनही तिथे शांतता प्रस्थापित का होऊ शकली नाही याचे उत्तर आता सरकार पक्षाच्या वाचाळवीरांनी द्यायला हवे. हिंसाचारात जळणाऱ्या मणिपूरची जनता दीड महिन्यापासून जीव मुठीत धरून जगते आहे आणि देशाचे पंतप्रधान या गंभीर संकटाविषयी चकार शब्दही बोलत नाहीत, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.