मिशी-दाढीवर बोटं फिरवत उसनं अवसान आणतायेत, झुरळांना पण मिशा…; संजय राऊत यांचा कुणावर निशाणा?

Saamana Editorial : शाईस्तेखानाची बोटं छाटणारा महाराष्ट्र, झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?, फवारणी करून ढेकूण-झुरळं मारावी लागतात; सामनातून संजय राऊतांचा कुणावर निशाणा?

मिशी-दाढीवर बोटं फिरवत उसनं अवसान आणतायेत, झुरळांना पण मिशा...; संजय राऊत यांचा कुणावर निशाणा?
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 7:52 AM

मुंबई | 05 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. सध्या काही लोक मिशी आणि दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत. शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?, असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत. आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे, पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात.

शिवरायांच्या महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे. मणिपूर, हरयाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही. फडणवीसांना हे असे गुरुजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या, फुले, आंबेडकर, शाहूंच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे, पण महाराष्ट्र हे शहाण्यांचे व शूरांचे राज्य आहे. शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?

मणिपुरात हिंसेचा आगडोंब पेटला असतानाच भारतीय जनता पक्षाच्या उपवस्त्रांनी आता हरयाणातही हिंसा भडकवून अनेकांचे बळी घेतले, मालमत्तेचे नुकसान केले. दहशतीचे वातावरण निर्माण केले. हरयाणाची आग राजधानी दिल्ली आणि राजस्थानातही पेटू शकते. तशी तयारी झाल्याची माहिती आहे.

हरयाणा व राजस्थानात लवकरच विधानसभा निवडणुका होतील. त्याची ही पूर्वतयारी दिसते. इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुले, संत साईबाबा, गांधी, नेहरू यांच्यावर घाणेरडय़ा भाषेत चिखलफेक करून माहौल बिघडवला आहे. हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय विद्वेष भडकवून आगी लावण्याच्या कारस्थानाचे हे पहिले पाऊल आहे. ज्या औरंग्यास महाराष्ट्राने गाडले त्याच्या कबरीवरची माती उकरण्याचा प्रयत्नदेखील सुरू झाला आहे.

देश घडविण्याची अक्कल नसली की, देश जाळून राज्य करायचे हा या मंडळींचा कावा आहे. संपूर्ण देशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी हे असे जातीय व धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करायचे व जागोजागी ढोंगी हिंदुत्वाच्या घंटा वाजवून प्रचारात उतरायचे असे एकंदरीत कारस्थान दिसते. त्या पूर्वतयारीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, फडणवीसांची गुरुजी ब्रिगेड अशा फौजांना आधीच मैदानात उतरवले गेले आहे.

महाराष्ट्रात फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुल्यांवर घाणेरडे विधान केले, तरीही फुल्यांचे वैचारिक वारसदार छगनराव भुजबळ हे फडणवीसांच्या मांडीस मांडी लावून सरकारात बसले आहेत. सत्तेसाठी विचारांना तिलांजली असेच एकंदरीत हे धोरण आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.