देवेंद्र फडणवीस यांना सारं पक्क माहीतीये पण, तरी ते देखल्या देवा दंडवत करतायेत; संजय राऊतांचा निशाणा

Sanjay Raut on Devendra Fadnavis : 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य अन् एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा; संजय राऊतांची धडाकेबाज पत्रकार परिषद

देवेंद्र फडणवीस यांना सारं पक्क माहीतीये पण, तरी ते देखल्या देवा दंडवत करतायेत; संजय राऊतांचा निशाणा
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 10:54 AM

नवी दिल्ली| 25 जुलै 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. एका म्हणीच्या आधारे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद राहणार नाही, पुन्हा एकदा असा दावा राऊतांनी केला आहे. तसंच 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे.

आम्ही जेव्हा म्हणतो की एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहणार नाहीत तेव्हा आमचं बोट सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे आहे. सर्वोच्च न्याालयाने दिलेले जे निर्देश आहेत ते जर विधानसभा अध्यक्षांनी पाळले. तंतोतंत त्याचं पालन केलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात काही तथ्य राहात नाही. ते देवेंद्रजी यांनाही पक्क माहिती आहे. पण तरिही शेवटी देखल्या देवा दंडवत असं सुरू आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

देवेंद्र फडणविस काय बोलतात यापेक्षा विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट के म्हटलं हे महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस काय अध्यक्ष आहेत का? सूर्य मावाळणारच आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

काहीही निर्णय घेतला तरी सरकार जाणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागणार आहे. 10 ऑगस्टपर्यंत हे सारं घडेल. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपद जाईल, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर म्हणाले…

उद्धव ठाकरे यांची मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. उद्या मुलाखत येईल.  त्यापूर्वीच टीका करायला लागलेत. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट होतील. मुलाखत येण्याआधीच मुलाखतीची चर्चा सुरू होतेय. टीका करणाऱ्यांना काही उद्योग नाहीत का? निधी वाटप सुरू आहे. त्यावर बोला, असं म्हणत राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.

टोलनाक्यांच्या तोडफोडीवरून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली आहे. अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, असं ट्विट भाजपकडून करण्यात आलं आहे. त्यावर मी यावर बोलणार नाही. मला प्रत्यक्ष विषय माहीती नाही, असं संजय राऊत म्हणाले.

चर्चा करायला जोडीनं या… पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सोबत यावं. आम्हाला चालेल… पण मणिपूर प्रश्नावर पंतप्रधान यांनीच बोलावं ही आमची मागणी आजही कायम आहे. मनमोहन सिंह यांना मौनी बाबा म्हणून बोलत होते. आता मात्र हे मौन धरून बसले आहेत. आता बोला… प्रश्नांची उत्तरं द्या, असं संजय राऊत म्हणालेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.