प्रत्येकाला थोडा त्याग करावाच लागेल!; पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत संजय राऊत यांचं सूचक ट्विट

Sanjay Raut on Pune Loksabha by Election 2023 : लोकसभेची पोटनिवडणूक, काँग्रेस-राष्ट्रवादीत दावे-प्रतिदावे; संजय राऊत यांचं सूचक ट्विट

प्रत्येकाला थोडा त्याग करावाच लागेल!; पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत संजय राऊत यांचं सूचक ट्विट
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 10:29 AM

मुंबई : पुण्यात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशात पुण्यातील जागेवरून दावे प्रतिदाने केले जात आहेत. पुण्याची जागा ही काँग्रेसकडे आहे, त्यामुळे ती आम्हीच लढणार, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे. तर पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी, अशी भूमिका अजित पवार यांची आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “कसेल त्याची जमीन या प्रमाणे… जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरलं तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणूक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!”, असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भाजपचे नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. तिथे आता लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशात महाविकास आघाडीत या जागेसाठी चुरस पाहायला मिळत आहे.

पुण्यात सध्या राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. आमदारांची संख्या आणि त्यांना मिळालेल्या मतांचा आकडा पाहिला तर लक्षात येतं की पुण्यात राष्ट्रवादी ताकद जास्त आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी अजित पवार यांची आहे.

काँग्रेसकडूनही या जागेवर दावा करण्यात आला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचीच जास्त ताकत आहे. शिवाय पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार आहोत. पुणे लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार काही हजार मतांनी पराभूत झाले आहेत, असं म्हणत काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी पुण्याच्या जागेवर दावा केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.