शिवसेना म्हणजे अग्निकुंड, शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं; काय म्हणाले संजय राऊत? वाचा…

Sanjay Raut on Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : ईडी, दहशतवादी संघटना अन् शिवसेना; 'आवाज कुणाचा' मुलाखतीचा टीझर प्रदर्शित.... शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलाखत प्रसिद्ध होणार

शिवसेना म्हणजे अग्निकुंड, शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं; काय म्हणाले संजय राऊत? वाचा...
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 10:26 AM

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यात संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. याचा टीझर काल प्रदर्शित झाला. यात संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतिहासावर भाष्य केलं. देशातील तपास यंत्रणांवर भाष्य केलं आहे. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेवरही संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना म्हणजे अग्निकुंड, शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं, असं म्हणत त्यांनी भाजपला सुनावलं आहे. ईडी ही एक दहशतवादी संघटना आहे, असं वक्तव्यही राऊतांनी केलं आहे.

संजय राऊत यांची सविस्तर मुलाखत आज आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणार आहे. ठाकरेगटाचे सचिव आदेश बांदेकर ही मुलाखत घेणार आहेत. यात संजय राऊत आपल्या शैलीत विरोधकांवर तोफ डागताना दिसणार आहेत. तर याआधीही ‘आवाज कुणाचा’मधून ठाकरे गटातील नेत्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. उद्धव ठाकरे, अनिल परब, कैलास पाटील, नितीन देशमुख यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.

मराठी माणूस, त्याला तुम्ही भिकारी, दरिद्री म्हणत होता, घाटी, कोकणी म्हणून हिणवत होता, त्या माणसाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी ही शिवसेना स्थापन झाली. आता मित्र पक्षांनी फसवलं, म्हणून शिवसेना थांबली का? शिवसेना संपली का?, असं या टीझरमध्ये संजय राऊत म्हणत आहेत.

शिवसेना म्हणजे अग्निकुंड आहे. शिवसेना म्हणजे आग आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं!, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला ललकारलं आहे. शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. शिवसेना ही महाराष्ट्रासाठी संघर्ष करण्यासाठी जन्माला आली आहे. शिवसेना विझली तर महाराष्ट्रातील आग संपेल, असं ते म्हणालेत.

भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने आमच्याशी वर्तवणूक केली. त्याला आता क्षमा केली जाणार नाही. भाजपचे लोक घाबरतात. महापालिका निवडणुका घेत नाही, लोकसभा निवडणूक तरी ते घेतील का? ही चिंता आहे. भाजप जनतेला घाबरतं. जो जनतेला घाबरतो तो नेता नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून त्यांनी बाळासाहेबांची संघटना दोन पावलं पुढे नेली आहे. त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी विस्तारासाठी प्रयत्न केले, असं संजय राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.