देवेंद्र फडणवीसांची ‘कुडल्यां’ची भाषा धमकी नव्हती काय? मुख्यमंत्र्यांवरील टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धमकीवजा विधानं केली आहेत. त्यात सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, ही धमकी नव्हती काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय.

देवेंद्र फडणवीसांची 'कुडल्यां'ची भाषा धमकी नव्हती काय? मुख्यमंत्र्यांवरील टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 3:01 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याला गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. त्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.(Sanjay Raut criticize opposition leader Devendra Fadnavis)

‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धमकीवजा विधानं केली आहेत. त्यात ‘सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, ही धमकी नव्हती काय?’ असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय. आज महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे. विरोधी पक्षानंही त्यांच्या पद्धतीनं वर्षपूर्ती साजरी केली. त्याचा मी आदर करतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला. “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं”, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.

“हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुवून लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती”, असं फडणवीस म्हणाले.

धनंजय मुंडे यांचंही फडणवीसांना प्रत्युत्तर

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका’, असा इशाराच धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. ‘उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीनं बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.

संबंधित बातम्या:

फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका, धनंजय मुंडे मैदानात

कुछ लोगों को सीख नहीं मिलती! उनसे अपेक्षा क्या करना, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, थेट उद्धव ठाकरेंवर 10 बोचरे वार

Sanjay Raut criticize opposition leader Devendra Fadnavis

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.