उद्धव ठाकरेंनी मोदींना सल्ला देऊ नये, तेवढी त्यांची लायकी नाही!; शिंदे गटातील आमदाराचा थेट शाब्दिक हल्ला

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला, संजय राऊतांवर टीका अन् शरद पवार यांची राजकीय भूमिका; पाहा शिंदे गटातील आमदाराचं वक्तव्य

उद्धव ठाकरेंनी मोदींना सल्ला देऊ नये, तेवढी त्यांची लायकी नाही!; शिंदे गटातील आमदाराचा थेट शाब्दिक हल्ला
uddhav thackeray-Narendra modi
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 1:49 PM

मुंबई | 08 ऑगस्ट 2023 : शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देऊ नये की त्यांनी काय करायला हवं. तेवढी त्यांची लायकी नाहीये, असं संजय शिरसाट म्हणालेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेवरही संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री त्यांच्या परीने काम करत आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल. मात्र, मी ट्विट केलं आहे. मी भेट घेतली आहे. मुद्दा उचलला आहे. म्हणून मुख्यमंत्री भेटले अशा गोड गैरसमजात अदित्य ठाकरे असतील तर त्यांनी राहावं . पण मुख्यमंत्री शिंदे त्यांचं काम चोख करतात. तुमच्या सल्ल्याची गरज नाही, असं म्हणत शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांना आता काय काम धंदा राहिलेलं नाही. त्यांनी भविष्य सांगण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला असावा. आधी सांगितलं एक महिन्यात सरकार पडेल. मग म्हणाले दोन महिन्यात पडेल. सहा महिन्यात पडेल. पण सरकार अजून चालतं आहे. त्यांचं पितळ उघडं पडलं आहे. त्यामुळे आता त्यांनी हेच काम करत राहावं. पुन्हा पूर्ण बहुमताने हे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असं शिरसाटांनी म्हटलं आहे.

राज्यपाल म्हणजे काय सकाळचा भोंग आहे काय? उठला आणि वाजायला सुरुवात झाली. संजय राऊत समजलं का राज्यपालांना? भोंगा वाजवायची सवय संजय राऊत तुमची आहे. राज्यपालांची नाहीये. ते शांत राहून बरोबर आपलं काम करतात. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, असं म्हणत राज्यपाल रमेश बैस यांच्या कामकाजावर बोलताना शिरसाटांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

शरद पवार हे इंडियामध्ये जाणार नाही, असं म्हणतात. म्हणजेच ते भविष्यामध्ये एनडीएमध्ये येतील. हे देखील तितकच सत्य आहे. पवार सांगतात एक आणि करतात काहीतरी वेगळच. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. आमच्या माहितीप्रमाणे शरद पवार हे भविष्यामध्ये भाजपसोबत येऊ शकतात, असं म्हणत शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवरही शिरसाटांनी भाष्य केलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.