मुंबई सत्र न्यायालयाची राणा दाम्पत्याला नोटीस, राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ

मुंबई सत्र न्यायालयाची राणा दाम्पत्याला नोटीस जारी करण्यात आली आहे.

मुंबई सत्र न्यायालयाची राणा दाम्पत्याला नोटीस, राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ
तुमचं अनाधिकृत बांधकाम का पाडू नये? नवनीत राणा यांना महापालिकेची पुन्हा नोटीसImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 3:02 PM

मुंबई – मुंबई सत्र न्यायालयाची (Mumbai Sessions Court) राणा दाम्पत्याला नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने मीडियासमोर न बोलण्याची अट घातली होती. त्या अटीचं राणा दाम्पत्याकडून उल्लंघन झाल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे. सकाळी नवनीत राणा (Navneet Rana)आणि रवी राणा (Ravi rana) यांनी जाहीरपणे मीडियाशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली. तसेच राज्यात सुरु असलेल्या नाट्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं सुध्दा त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी न्यायालयात एक अर्ज दाखल केल्यानंतर ही नोटीस देण्यात आली आहे.

जामीनपात्र वॉरंट का जारी केला

मुंबईतील सत्र न्यायालयाने सोमवारी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी केला आहे. कारण त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावरती पोलिसांनी केला आहे. राणा दाम्पत्याच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द करण्यात आला आहे, असा अर्ज मुंबई पोलिसांनी न्यायालयात दाखल केल्यानंतर ही नोटीस देण्यात आली आहे.

उद्या उद्धव ठाकरे यांनी लिलावती तोडले तरी आश्चर्य वाटायला नको

आम्हाला कोर्टाने जे आदेश दिले त्याचे आम्ही पालन केले आहे. मी कोर्टातील प्रक्रियेबाबत कुठेचं बोलत नाही. पण आमच्यासोबत जे घडलं त्याबाबत बोलण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे. तसेच राजकारणात आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. मी कोर्टाच्या निर्णयाबद्दल काहीही बोलले नाही. मी प्रत्येक गोष्ट कोर्टाच्या आदेशाप्रमाणे करत आहे. हनुमान चालीसा वाचण्यासाठी आम्हाला भाजपच्या आधाराची गरज नाही. त्यांची सत्ता आहे, त्यामुळे ते सत्तेचा दुरूपयोग करत आहेत. मात्र जिथं लोकांची ट्रिटमेंट होते तिथे जाऊन ही लोक चौकशी करीत आहेत. हे रुग्णालयापर्यंत पोहोचले आहे, ही सुडबुद्धी आहे. उद्या उद्धव ठाकरे यांनी लिलावती तोडले तरी आश्चर्य वाटायला नको असं नवनीत राणा म्हणाल्या.

मी तीनवेळा शिवसेनेच्या उमेदवारांना हरवलं आहे

माझ्या घरावरील कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून करण्यात आली आहे. आमचं मुंबईत एकचं घर आहे. शिवसेनेच्या नेत्यांसारखी आमच्याकडे दहा घरं नाहीत. मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहाव आणि हवं तर संजय राऊत आणि अनिल परबांनाही घर दाखवावं. कारण आता त्यांना तेवढेच काम उरले आहे. दोन लोकांनी हनुमान चालीसा वाचण्याने सरकार पडेल असे कोर्टात सांगतात. आम्हाला सरकार पाडायची गरज नाही, जनता या सरकारला त्यांची जागा दाखवेल. हनुमानाने लंका जाळली, तशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची होणार आहे. मी तीनवेळा शिवसेनेच्या उमेदवारांना हरवलं आहे. मी लोकांची सेवा करतो, मागच्यावेळी यांनी मला जेलमध्ये टाकलं होतं. उद्धव ठाकरेंना ग्राऊंड लेव्हलचं शून्य नॉलेज आहे. उद्धव ठाकरेंनी हवा तो मतदारसंघ निवडूण लढून दाखवावं. लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील अशी टीका रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यावर केली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.