राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण- शरद पवार!; गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच व्हीडिओची चर्चा
Sharad Pawar Viral Video : अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, शरद पवारांच्या 'त्या' दोन शब्दांनी लक्ष वेधलं...
मुंबई : तारीख 2 जुलै… दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली अन् महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी पक्षात फूट पडली की ही शरद पवार यांचीच राजकीय खेळी आहे? अशा चर्चा गावागावात रंगू लागल्या. या सगळ्या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली अन् राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले. पण या पत्रकार परिषदेतील शरद पवार यांच्या एका उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं.
आगामी काळात राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण आहे, असं तुम्हाला वाटतं? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला तेव्हा शरद पवारांनी आपला हात उंचावला अन् म्हणाले शरद पवार!
शरद पवार यांच्या या उत्तराने पत्रकार परिषदेत हास्याचे फवारे उडाले आणि पुढच्या काहीच वेळात हा व्हीडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला.
सोशल मीडियावर हा व्हीडिओ अनेकांनी शेअर केला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप स्टेटस, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हीडिओ शेअर केला आहे.
अवघ्या 13 सेकंदाच्या या व्हीडिओने सोशल मीडिया व्यापला आहे. तसंच राजकीय वर्तुळातही हा व्हीडिओ चर्चेत आहे. ठिकठिकाणी या व्हीडिओची चर्चा होत आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला Inspiration!, असं कॅप्शन दिलं आहे.
Inspiration ⏰⏰?✌️? pic.twitter.com/sgOHvGvM6f
— Supriya Sule (@supriya_sule) July 2, 2023
पत्रकार – “तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण..?” साहेब – “शरद पवार” साहेबांचा हा आत्मविश्वासच आमच्या लाखो कार्यकर्त्यांच्यामधे उत्साह निर्माण करण्यास पुरेसा आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार यांचा हा व्हीडिओ शेअर केलाय.
पत्रकार – “तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण..?” साहेब – “शरद पवार” साहेबांचा हा आत्मविश्वासच आमच्या लाखो कार्यकर्त्यांच्यामधे उत्साह निर्माण करण्यास पुरेसा आहे. pic.twitter.com/kRoOOjwpbd
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 2, 2023
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही हा व्हीडिओ पोस्ट केला आहे. शरद पवार… बस नाम ही काफी हैं!, असं त्यांनी हा व्हीडिओ शेअर करताना म्हटलं आहे.
#शरद_पवार बस नाम ही काफी हैं… pic.twitter.com/6PVhCmpc7C
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 2, 2023
शरद पवार यांचा आजचा दौरा कसा?
शरद पवार आज कराडला यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत. पुण्यातील मोदी बागेच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शरद पवार कराडच्या दिशेने जाताना खेड शिवापूर टोल नाक्यावर त्यांचं स्वागत केलं गेलं आहे. सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाचं शरद पवार दर्शन घेणार आहेत. 11.15 वाजता कराडहून साताऱ्याला जाणार आहेत. त्यानंतर 3.30 वाजता साताऱ्याहुन मुंबईकडे रवाना होणार आहेत.