वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांकडे सुप्रिया सुळे यांची विशेष मागणी; म्हणाल्या, मला हे गिफ्ट द्या…

Supriya Sule on Her Birthday : मला 'हे' गिफ्ट द्या... ; वाढदिनी सुप्रिया सुळे यांची नेत्या आणि कार्यकर्त्यांकडे मागणी

वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांकडे सुप्रिया सुळे यांची विशेष मागणी; म्हणाल्या, मला हे गिफ्ट द्या...
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 1:44 PM

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर चहूबाजूने शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वाढदिवसाच्या निमित्त सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना विशेष आवाहन केलं आहे. मला वाढदिवसानिमित्त भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊ नका तर एक विशेष गोष्ट करा. जेणे करून मला माझ्या वाढदिवशी अनमोल भेटवस्तू मिळेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांचं ट्विट जसंच्या तसं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आवाहन…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त होत असते. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा मला देण्यासाठी उत्सुक आहेत याची मला जाणीव आहे. आपणा सर्वांना मी एकच नम्र आवाहन करू इच्छिते की शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदींचे वाटप करावे.

या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करेन. आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण हा गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, माझ्यासाठी वाढदिवसाची हीच अनमोल भेट ठरेल.

शुभेच्छांचा वर्षाव

सुप्रिया सुळे यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा, असं म्हणत अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित पवार यांनीही ट्विटच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या संसदरत्न खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!, असं ते म्हणालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.