प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार? उद्धव ठाकरे यांचं थेट आणि स्पष्ट भाष्य

Uddhav Thackeray on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी फक्त 'ही' एक गोष्ट करावी, मग महाविकास आघाडीत चर्चा होईल; वंचित महाविकास आघाडीत येण्यावर उद्धव ठाकरे यांचं स्पष्ट भाष्य

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार? उद्धव ठाकरे यांचं थेट आणि स्पष्ट भाष्य
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 8:51 AM

मुंबई | 27 जुलै 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त ठाकरे गटाकडून ‘आवाज कुणाचा’ या मुलाखत सत्रातून त्यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी हे भविष्यात एकत्र येण्याची कितपत शक्यता आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भाष्य केलंय.

महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर सामील होतील, असं एक वातावरण आपण निर्माण केलं होतं, ते का थांबलं?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतील, असं वातावरण तयार केलं होतं नाही, तर ते अजूनही तसंच आहे. प्रकाश आंबेडकर आणि माझी आता नजिकच्या काळात प्रत्यक्ष भेट झालेली नाही. आमच्या वज्रमूठ सभा सुरु होत्या. मग राष्ट्रवादीचा एक गट फुटला, नुकतंच इर्शाळवाडीची दुर्घटना घडली. या सगळयामध्ये आमची प्रत्यक्ष भेट झाली नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

याआधी मी प्रकाश आंबेडकरांना सांगितलं आहे की, तुमच्या मनात काय आहे? त्याचा प्रस्ताव द्या. कारण तुमच्या मनात काय आहे, काय भूमिका आहे याचा आम्हाला अंदाज येऊ द्या, मग त्यावर चर्चा होईल. महाविकास आघाडीची समिकरणं सध्या बदलली आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावावर चर्चा होईल आणि मला खात्री आहे की ते सोबत राहतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपवर घणाघात

आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजप आहे. त्यांचा कोणताही नेता आला तर त्यांना उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे काही बोलता येत नाही. आता खरं तर उद्धव ठाकरेंकडे आहेच काय? पक्ष नाही, शिवसेना तुम्ही चोरली आहे, चिन्ह चोरलं आहे, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते? म्हणूनच मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला आहे.

एकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दोघांना वाचवलं होतं. माननीय पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना… त्याचे पांग तुम्ही असे फेडताय का? आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही संपवा. बघू या माझ्या वडिलांचे आशीर्वाद, जनतेची सगळी साथसोबत आणि तुमची ताकद माझ्या पाठीशी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

इंडियाला एनडीएचा पराभव करावाच लागेल आणि मी करणारच. हे होऊ शकतं हे दाखवून द्यावंच लागेल, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.