“नितीन राऊतांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू”, महावितरणच्या भरती प्रक्रियेवरुन विनायक मेटेंचा इशारा
मराठा समाज महावितरणच्या भरती प्रक्रियेबाबत नाराज नसल्याचं म्हटलंय. त्यावर नितीन राऊत यांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. तसंच भरती प्रक्रियेतील उमेदवारांना सावध पवित्रा घेण्याचं आवाहनही मेटे यांनी केलं आहे.
मुंबई: महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक, पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदाकरिता भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ही भरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहुन सर्व प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC)वगळून नियुक्ती आदेश देण्यात येतील आणि अशा उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, अशी जाहिरात महावितरणकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना इशारा दिला आहे. (Vinayak Mete warns Energy Minister Nitin Raut about MSEDCL recruitment process)
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भरती प्रक्रियेबाबत मराठा समाज नाराज नसल्याचं म्हटलंय. मराठा समाजाच्या काही मुलांना ओपनमध्ये तर काहींना SEBC मध्ये सामावण्यात आलं असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे मराठा समाज महावितरणच्या भरती प्रक्रियेबाबत नाराज नसल्याचं म्हटलंय. त्यावर नितीन राऊत यांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. तसंच भरती प्रक्रियेतील उमेदवारांना सावध पवित्रा घेण्याचं आवाहनही मेटे यांनी केलं आहे.
महावितरणकडून भरती प्रक्रियेची जाहिरात, मराठा समाजाचा विरोध
भरती प्रक्रियेवरुन मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाकडून एक प्रसिद्धिपत्रक काढण्यात आलं आहे. त्यात राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. “महाराष्ट्र सरकारने दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर मराठा समाजाला संक्रांत भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाने वारंवार सांगितले आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षण विषय संपत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाऊ नये. वरिल निर्णय जे विद्यार्थी पास झाले आहेत. फक्त नियुक्ती आदेश राहिले आहे त्यांचे आहेत. म्हणजे मराठा आरक्षण घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना हे सरकार बाजूला ठेवून इतरांना नियुक्ती देत आहे. शुभ मुहूर्त हा दिवाळी घेतला कारण सण असल्याने आंदोलन होणार नाही. बाकी सर्व मराठे सूज्ञ आहेत”. अशा शब्दात महावितरणच्या भरती प्रक्रियेला विरोध दर्शनवण्यात आला आहे.
महावितरणच्या या निर्णयाला मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे. मराठा समाजाची दिवाळी काळी करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची भावना मराठा समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे. SEBC वगळून ऊर्जामंत्री नितीन राऊत इतर प्रवर्गाला नियुक्ती आदेश देत आहे. त्यामुळे संघर्ष अटळ असल्याचा इशारा मराठा समाजानं दिला आहे.
संबंधित बातम्या:
नोकरभरती ते मेडिकल प्रवेश, विनायक मेटेंच्या मुख्यमंत्र्यांकडे 9 मागण्या
मातोश्रीवर मोर्चा घेऊन जाणारच, परवानगी नाकारुन उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळतायत: विनायक मेटे
Vinayak Mete warns Energy Minister Nitin Raut about MSEDCL recruitment process