शिंदे-फडणवीस विरोधकांना अजून एक झटका देण्याच्या तयारीत? सर्व महापालिकेत 4 सदस्यांचा एक प्रभाग करा, सरनाईकांचं शिंदेंना पत्र

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग करावा, असं पत्र आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.

शिंदे-फडणवीस विरोधकांना अजून एक झटका देण्याच्या तयारीत? सर्व महापालिकेत 4 सदस्यांचा एक प्रभाग करा, सरनाईकांचं शिंदेंना पत्र
प्रताप सरनाईक, आमदार, Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 5:25 PM

मुंबई : राज्यातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर राज्यातील हा मोठा राजकीय प्रश्न निकाली निघालाय. अशावेळी नवनिर्वाचित शिंदे आणि फडणवीस सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अजून एक झटका देण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिका वगळता अन्य महापालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती जाहीर केली होती. मात्र, राज्यातील सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग करावा, असं पत्र आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यांची प्रभागरचना केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणासह निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणासह प्रभाग रचना करणं बंधनकारक असल्याचं सरनाईक यांचं मत आहे. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांची प्रभाग रचना करण्याचा विषय मंजूर करुन, येत्या अधिवेशनात त्याची अंतिम मंजुरी घ्यावी अशी विनंती सरनाईक यांनी पत्राद्वारे केलीय. सेना-भाजप युती सरकारच्या काळात राज्यातील सर्व महापालिकेत चार नगरसेवकांचा एक प्रभाग होता आणि त्यानुसार निवडणुकाही पार पडल्या होत्या.

प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी!

प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. एक-एक करत आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेत उभी पूट पडली. प्रताप सरनाईक यांनी आग्रहाने शिंदे गटाची बाजू लावून धरली त्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. सरनाईकांच्या बंडामुळे आता पुर्वेश यांच्यावरही कारवाई झाल्याचं दिसतंय. त्यांच्यासोबतच सहसचिव किरण साळी यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी नव्या पदाधिकारऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.