त्रिपुरा ते महाराष्ट्र अशांतता, तणाव; राऊत म्हणतात ही तर भाजपची 2024 च्या निवडणुकीत उतरण्याची तयारी

नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये मुस्लिम समाजाकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चावेळी जमाव हिंसक झाल्याचं पाहायला मिळालं. या तिन्ही शहरात मुस्लिम मोर्चावेळी दगडफेक करण्यात आली. अनेक चारचाकी वाहनं, दुचाकींची मोडतोड करण्यात आली. काही ठिकाणी दुकानंही फोडण्यात आली. या हिंसाचाराचा निषेध शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्याचवेळी राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

त्रिपुरा ते महाराष्ट्र अशांतता, तणाव; राऊत म्हणतात ही तर भाजपची 2024 च्या निवडणुकीत उतरण्याची तयारी
मुस्लिम मोर्चातील हिंसाचारावरुन संजय राऊतांची भाजपवर टीका
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 9:17 PM

औरंगाबाद : त्रिपुरातील कथित घटेनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये मुस्लिम समाजाकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चावेळी जमाव हिंसक झाल्याचं पाहायला मिळालं. या तिन्ही शहरात मुस्लिम मोर्चावेळी दगडफेक करण्यात आली. अनेक चारचाकी वाहनं, दुचाकींची मोडतोड करण्यात आली. काही ठिकाणी दुकानंही फोडण्यात आली. या हिंसाचाराचा निषेध शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्याचवेळी राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. (Sanjay Raut criticizes BJP over violence in Nanded, Malegaon, Amravati in Muslim Agitation)

त्रिपुरातील अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रात पडसाद उमटण्याचं, दगडफेक करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात सर्व समाज, धर्म, जातींबद्दल सद्भावना असणारं सरकार आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन ते काय साध्य करणार? त्रिपुरातील परिस्थितीची आम्हालाही चिंता आहे. विशेषत: ईश्यानेकडील सीमेवर जी राज्य आहेत तिथे शांतता राहावी, तिथे कुठल्याही कारणामुळे अस्थिरता नांदू नये, ही आमची भूमिका कायम असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर त्रिपुरातील ठिगण्या महाराष्ट्रात उमटू नयेत. भाजपला देशभरात अशा प्रकारची अस्वस्थता निर्माण करुन 2024 च्या निवडणुकीत उतरायचं आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केलाय.

कठोर कारवाई करा, गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

सरकारने या घटनेची गंभीरपणे देखल घेतली आहे. पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. काही समाजकंटक वातावरण भडकवत असतात त्यांना सोडू नका. त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश दिल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. तसंच राज्यातील काही शहरात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली असून समाजाचा माथी भडकवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे, असं ते म्हणाले.

नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा

मुस्लिम समाजाच्या मोर्चावेळी झालेल्या आंदोलनात झालेल्या दगडफेकीच्या घटनेवरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. ‘हे मोर्चे महाराष्ट्र सरकारनी थांबवले नाही तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील. हे राज्य सरकारनं लक्षात घ्यावं’, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलंय.

इतर बातम्या : 

Video: अमरावतीत मुस्लिमांच्या मोर्चाला हिंसक वळण, भाजपाचं उद्या बंदचं आवाहन, काय घडतंय अमरावतीत?

VIDEO | त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ सुरु असलेल्या मालेगावात बंदला गालबोट, आंदोलकांकडून दगडफेक

Sanjay Raut criticizes BJP over violence in Nanded, Malegaon, Amravati in Muslim Agitation

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.