काँग्रेस नेते गिरीश पांडव यांचे बॅनर हटवले, युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचं नागपूर महापालिका मुख्यालयात आंदोलन
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरीश पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे बॅनर महापालिकेनं काढले. त्यामुळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते महापालिका मुख्यालयात आंदोलन करत रोष व्यक्त केला.
मुंबई : नागपूरात काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांचे बॅनर हटविल्याच्या विरोधात युवक काँग्रेसनं महापालिका मुख्यालय परिसरात आंदोलन केलं. शहरात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचे बॅनर लागले आहेत. त्यामुळं सध्या शहरात भाजप आणि काँग्रेसमध्ये बॅनर वॉर सुरू झालंय. यातच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरीश पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे बॅनर महापालिकेनं काढले. त्यामुळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते महापालिका मुख्यालयात आंदोलन करत रोष व्यक्त केला. त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवल्याचं पाहायला मिळालं. (Youth Congress is aggressive after removing the banners of Congress leader Girish Pandav)
गिरीश पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, महापालिकेनं ते बॅनर काढले आहेत. त्यामुळे संतापलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट महापालिका आयुक्त कार्यालयाकवरच मोर्चा वळवला. महापालिका आयुक्त हे भाजपचे प्रचारक असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. महापालिका आयुक्त कार्यालयात घुसण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना महापालिका आयुक्त कार्यालयात घुसता आलं नाही.
भाजपचे बॅनर्स काढण्याच्या नाना पटोलेंच्या सूचना
नागपूर महानगरपालिका निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरुन प्रचाराची संधी नगरसेवक सोडत नाहीत. नागपूरातील काही लसीकरण केंद्रावर भाजपचे बॅनर्स लागल्याची तक्रार काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आढावा बैठकीतूनच थेट नागपूर पोलीस आयुक्त आणि नागपूर महानगरपालिका आयुक्तांना फोन केला. लसीकरण केंद्रावरील भाजपचे बॅनर्स काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवत एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस कामाला
नागपूर महानगरपालिकेत गेल्या 15 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. आता निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने पुन्हा एकदा भाजप जोमानं कामाला लागलीय. भाजपला टक्कर देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मैदानात उतरले आहेत. याचाच एक भाग म्हणून कोरोना लसीकरण केंद्रांवर बॅनर्सवरुन काँग्रेस भाजप आमनेसामने पहायला मिळाली. काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणूकीची तयारी सुरु केलीय. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या आणि भाजपला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिले.
संबंधित बातम्या :
नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन, पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंची कारवाई
Youth Congress is aggressive after removing the banners of Congress leader Girish Pandav