नागपुरात भाजपला मोठा धक्का, व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपमध्ये गेली अनेक वर्षे काम केलेले व्यापारी आघाडीचे शहर उपाध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला

नागपुरात भाजपला मोठा धक्का, व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 4:17 PM

नागपूर : नागपूर भाजप व्यापारी आघाडीच्या शहर उपाध्यक्षांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. नागपूरचे काँग्रेस शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांच्या उपस्थितीत गुड्डू अग्रवाल (Guddu Agarwal) यांच्यासह 25 ते 30 व्यापाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Nagpur BJP officials joins Congress in presence of MLA Vikas Thackeray)

भाजपमध्ये गेली अनेक वर्षे काम केलेले व्यापारी आघाडीचे शहर उपाध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला. विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या समर्थकांसह पक्षप्रवेश केला. भाजपची धोरणं व्यापाऱ्यांच्या हिताची नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या हितासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं यावेळी गूड्डू अग्रवाल यांनी सांगितलं.

भाजपच्या धोरणांना व्यापारी कंटाळले आहेत. गेल्या काही वर्षांत भाजपमुळे व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे हे व्यापारी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, असं मत विकास ठाकरे यांनी व्यक्त केलं.

याआधी, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिंदोरे यांच्यासह पूर्व नागपुरातील काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी हे कार्यकर्ते फोडल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र आता काँग्रेसमध्येही कार्यकर्त्यांचे बळ वाढताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून प्रा. बबनराव तायवाडे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला दोन वेळा टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे आता तरुण दमाचे अभिजित वंजारी यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. (Nagpur BJP officials joins Congress in presence of MLA Vikas Thackeray)

भाजपकडून यंदा विद्यमान आमदार अनिल सोले यांच्याऐवजी महापौर संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

संबंधित बातम्या : 

नागपूरमध्ये काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, काँग्रेसची नाराजी

(Nagpur BJP officials joins Congress in presence of MLA Vikas Thackeray)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.