नागपूरचे महापौर संदीप जोशी राजीनामा देण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळ

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप जोशी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता ते सध्या नॅाट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे.

नागपूरचे महापौर संदीप जोशी राजीनामा देण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळ
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 9:02 AM

नागपूर : पदवीधर निवडणुकांचा (graduate election) निकाल लागल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नागपूर पदवीधर मतदार संघातून (Nagpur Graduate Constituency Election) मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी राजीनामा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पदवीधर निवडणूकीत पराभव स्वीकारत राजीनामा देणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप जोशी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता ते सध्या नॅाट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे. (Nagpur Mayor Sandeep Joshi resign from post because of accepting defeat in graduate election)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या राजीनाम्याविषयी भाजप अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना विचारलं असता अद्याप कोणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही. त्यामुळे याबद्दल आज दिवसभरात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरंतर, गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात (Nagpur Graduate Constituency Election) काँग्रेसने झेंडा फडकवला. भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांचा पराभव करत काँग्रेसचे अभिजीत वंजारी (Abhijit Vanjari) मोठ्या फरकाने विजयी झाले.

काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला. यामुळे संदीप जोशी यांनी पराभव स्वीकारत राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

“नागपूरच्या पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा”

“नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्याने नागपूरच्या या पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा झाली आहे” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजयानंतर दिली होती.

भाजप बेसावध, मुनगंटीवारांची कबुली

‘महाविकास आघाडीला मतदारांनी स्वीकारलं, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण ही सार्वत्रिक निवडणूक नाही. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या जागा होत्या, हे खरं आहे. त्या गमावणं हे राजकीय दृष्टीने चिंतनीय आहे. त्याचं चिंतन केलं जाईल. आम्ही बेसावध राहिलो, त्यामुळे निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचं विश्लेषण करु, पण भाजपची पिछेहाट अजिबात नाही. ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं आपण पदवीधरमध्ये जिंकून येतो, हा आभास होता’ असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलं. (Nagpur Mayor Sandeep Joshi resign from post because of accepting defeat in graduate election)

इतर बातम्या – 

Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक

Bharat Bandh today : ‘7/12 वर नाव टिकवायचं तर 8/12च्या संपात सामील व्हा’

(Nagpur Mayor Sandeep Joshi resign from post because of accepting defeat in graduate election)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.