Tukaram Mundhe | आपण नक्की जिंकू, आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती (Tukaram Mundhe Corona positive) दिली.

Tukaram Mundhe | आपण नक्की जिंकू, आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 9:13 AM

नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नाही, अशी माहिती मुंढेंना दिली. आपण नक्की जिंकू, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Tukaram Mundhe Corona positive)

“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात कोणतीही लक्षण नाही. मी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं आहे. दरम्यान गेल्या 14 दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी,” असे ट्विट त्यांनी केले आहे.

तसेच “नागपुरातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी पुढील काही दिवस मी घरातून काम करेन. आपण नक्की जिंकू,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान नागपुरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी अनेक मास्टरप्लॅन केले आहेत. तसेच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी  तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर हे विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं हे विषेश पथक गठन करण्यात आलं. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लागणार असल्याचं दिसत आहे. मनपाचं हे विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. तसेच काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारणार आहे. (Tukaram Mundhe Corona positive)

संबंधित बातम्या : 

नागपूरमधील खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वॉच, तुकाराम मुंढेंकडून विशेष पथकाचं गठन

तुकाराम मुंढेंच्या पाठीशी आहात का? मुख्यमंत्री म्हणतात….

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.