राज्याच्या उपराजधानीत महाविकासआघाडीत ‘बिघाडी’, राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेसवर नाराजी

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात महाविकासआघाडीत बिघाडीची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे.  (Nagpur NCP Angry On Congress due to Election seats)

राज्याच्या उपराजधानीत महाविकासआघाडीत 'बिघाडी', राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेसवर नाराजी
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 9:13 AM

नागपूर : येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 30 टक्के जागा द्या, अन्यथा शहरातील सर्व जागा लढू, असा इशारा नागपुरातील राष्ट्रवादी शहर अध्यक्षांनी काँग्रेसला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांनी घेतलेल्या बैठकीत काँग्रेसला हा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात महाविकासआघाडीत बिघाडीची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. (Nagpur NCP Angry On Congress due to Election seats)

नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजून सव्वा वर्षांचा कालावधी आहे. पण आतापासूनच वेगवेगळ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नुकतंच नागपुरात प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर उपस्थित होते.

आघाडीत काँग्रेसला आतापर्यंत सन्मानाने वागणूक दिली आहे. त्यामुळे येत्या मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला 30 टक्के जागा द्या, अन्यथा सर्व जागा लढू आणि ताकद दाखवू, असा इशारा अनिल अहिरकर यांनी आक्रमक होत काँग्रेसला दिला आहे.

नागपुरात राष्ट्रवादीने गृहमंत्रीपद दिलं आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्ष मजबूत झाला आहे. त्यामुळे जर 30 टक्के जागा मिळाल्या नाही, तर सर्व जागा लढवण्याचा निर्धार शहर राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच नागपूर शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.(Nagpur NCP Angry On Congress due to Election seats)

संबंधित बातम्या : 

…अन्यथा राज्यातील मंत्र्यांना विदर्भात फिरु देणार नाही, मनसेचा इशारा

एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.