विजय बारसे यांच्या झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेला प्रायोजक मिळावा, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर नागराज मंजुळे काय म्हणाले ?
'झुंड'(Jhund) चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांची सकाळी भेट घेतली आहे. फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी जाऊन नागराज मंजुळे यांनी भेट घेतली आहे. ज्यावेळी नागपूरात चित्रपटाचं चित्रीकरण झालं, त्यावेळी फडणवीस यांनी मदत केली होती.
नागपूर – ‘झुंड'(Jhund) चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांची सकाळी भेट घेतली आहे. फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी जाऊन नागराज मंजुळे यांनी भेट घेतली आहे. ज्यावेळी नागपूरात चित्रपटाचं चित्रीकरण झालं, त्यावेळी फडणवीस यांनी मदत केली होती. त्यामुळं त्यांचे आभार मानायला आलो असल्याचं नागराज मंजुळे यांनी सांगितले. विजय बारसे यांच्या झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेला प्रयोजक मिळत नाही, मिळायला पाहिजे, लोकांनी पुढं यायला हवं असंही नागराज मंजुळे म्हणाले. हिंदीतला पहिला चित्रपट झुंडची चर्चा देशात झाली. अनेक कलाकारांनी नागराज मंजुळेंच कौतुक देखील केलं. झुंड चित्रपटाच्या शुटिंगसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी चांगली मदत केल्याने त्यांची भेट घेऊन आज आभार मानले. त्यावेळी तिथं चंद्रकांत बानवकुळे देखील उपस्थित होते.
अमिताभ बच्चन यांनी झुंडमधील आपल्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले
अमिताभ बच्चन यांनी झुंडमधील आपल्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. अमिताभ बच्चन झुंडमध्ये फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या भूमिकेत आहे. अलीकडेच, मिस्टर बच्चन यांनी आमिर खानच्या कामगिरीचे कौतुक केलं. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन म्हणाले की, आमिरला नेहमी अतिउत्साही होण्याची सवय असते. पण त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. मला वाटते की आमिर नेहमीच चित्रपटांचा चांगला जज राहिला आहे. त्यामुळे मी खूप आभारी आहे. की त्याच्याकडे चित्रपटाबद्दल खूप प्रेमळ शब्द होते.” आमिर खानने स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान झुंडला पाहिले होते आणि सर्वांनी अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले होते. मराठी चित्रपट हीट दिल्यानंतर नागराज मंजुळे यांना हिंदीत काम करायचं होतं. तसेच अमिताभ बच्चन यांना घेऊन त्यांना एक चित्रपट करायचा होता. झुंड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याची देशात चर्चा झाली. अनेकांनी नागराज मंजुळेचं कौतुक केलं.
अमीर खानकडून नागराज मंजुळेचं कौतुक
काय हा चित्रपट, माय गॉड, हा एक अप्रतिम चित्रपट आहे. तेव्हा तो त्याच्या टी-शर्टने अश्रू पुसताना दिसत होता. आमिरनेही अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील कामाचे कौतुक केले.तसेच अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीत उत्तम चित्रपट केले आहे. पण हा त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे अशी प्रतिक्रिया अमिर खानने चित्रपट पाहिल्यानंतर दिली होती.