महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता : नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केलेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता : नाना पटोले
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 6:02 PM

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा करण्याऐवजी मोदी सरकार पाकिस्तान आणि इतर देशांना लस पुरवत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. तसेच सध्याच्या वेगाने लसीकरण होत राहिलं तर देशात संपूर्ण लसीकरण होण्यास 12 वर्षे लागतील, अशा इशाराही त्यांनी दिला (Nana Patole criticize Modi Government over Corona Vaccine supply to Maharashtra).

नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. कोरोना महामारीच्या मोठ्या संकटातून महाराष्ट्र पुन्हा जात आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे. सध्याच्या वेगानेच लसीकरण सुरु राहिले तर ते पूर्ण होण्यास 12 वर्ष लागतील. लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी लसींचा पुरवठाही त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे. परंतु देशात कोरोना रुग्ण वाढत असताना नरेंद्र मोदी हे पाकिस्तान व इतर देशांना लस पाठवत आहेत.”

“कोरोनाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. असं असताना ते महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत,” असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी केला.

‘केंद्रात काँग्रेस सरकार असताना महामारीचा मुकाबला मोठ्या शिताफीने केला’

नाना पटोले म्हणाले, “केंद्रात काँग्रेस सरकार असताना महामारीचा मुकाबला मोठ्या शिताफीने केला होता. बसस्टँडसारख्या सार्वजनिक ठिकाणी लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबवल्याने त्यावेळी महामारीवर मात करण्यात यश आलं. पण सध्या केंद्रातील सरकार तसे करताना दिसत नाही. नागपूरमध्येही कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे.”

‘पुलावामा स्फोटातील आरडीएक्स आणि अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांचं कनेक्शन काय?’

“पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला योग्य त्या सुचना दिलेल्या आहेत. प्रशासनही त्यांचे काम करत आहे. नागपूरच्या आसपासच्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण तुलनेने कमी असताना नागपुरातच कोरोना रुग्ण संख्या कशी काय वाढू लागली असा प्रश्न उपस्थित होतोय. पुलावामा स्फोटात वापरले गेलेले आरडीएक्स, अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत सापडलेली स्फोटके आणि नागपूर कनेक्शन आणि नागपुरात कोरोना का वाढतो याचं कनेक्शन काय आहे?” अशीही विचारणा पटोले यांनी केली.

‘सुशांतसिंह प्रकरण असो वा परमवीरसिंह प्रकरण भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम’

रश्मी शुक्ला आणि परमवीरसिंह प्रकरणी बोलताना नाना पटोले म्हणाले, “अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षाचे कठपुतळी बनू नये. त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करावे. कोणत्यातरी पक्षाला समर्पित होऊन अधिकारी काम करु लागले, तर ते लोकशाही तसेच प्रशासकीय व्यवस्थेलाही घातक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परमवीरसिंह आणि रश्मी शुक्ला प्रकरणी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. भाजप व फडणवीस यांची खोटं बोल, पण रेटून बोल, अशी भूमिका राहिलीय. सुशांतसिंह प्रकरण असो वा परमवीरसिंह प्रकरण असो यातही त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच काम केले.”

हेही वाचा :

नाना पटोलेंच्या इशाऱ्यानंतर काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची ठाम भूमिका; शरद पवारांबद्दल आदर पण….

लक्षात ठेवा, ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला रोखठोक इशारा

हद्द झाली राव, मोदीजी आणखी किती फेकणार?; नाना पटोलेंचा बोचरा वार

व्हिडीओ पाहा :

Nana Patole criticize Modi Government over Corona Vaccine supply to Maharashtra

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.