Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल, नाना पटोलेंचा पलटवार

आमच्या हाती सत्ता द्या, 4 महिन्यात ओबीसींची आरक्षण पूर्ववत करतो, अन्यथा राजकीय सन्यास घेईन असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी चक्काजाम आंदोलनादरम्यान नागपुरात केलं होतं. फडणवीसांच्या याच वक्तव्यावर पटोले यांनी पलटवार केलाय.

महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल, नाना पटोलेंचा पलटवार
नाना पटोल आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 7:13 PM

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या आव्हानाला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती. पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. आता मात्र भाजपा नेते ओबीसींचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत, असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे. (Nana Patole criticizes Devendra Fadnavis on the issue of OBC reservation and political retirement)

आमच्या हाती सत्ता द्या, 4 महिन्यात ओबीसींची आरक्षण पूर्ववत करतो, अन्यथा राजकीय सन्यास घेईन असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी चक्काजाम आंदोलनादरम्यान नागपुरात केलं होतं. फडणवीसांच्या याच वक्तव्यावर पटोले यांनी पलटवार केलाय. देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली आहे. आता राज्यातील जनताच देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संन्यास देईन, अशा शब्दात नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पटोले आज टिळक भवनात माध्यमांशी बोलत होते.

‘देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन’

देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन आहे. खोटं बोल पण रेटून बोल हा त्यांचा स्थायीभाव आहे. 2014 च्या निवडणुकीआधीही त्यांनी धनगर समजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. पण पाच वर्षात त्यांना आरक्षण दिलं नाही. धनगर समजाची त्यांनी घोर फसवणूक केली. मराठा समाजाचीही दिशाभूल केली आणि त्यांचे आरक्षण रद्द झाले. आता ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही तेच झालं आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षण संपुष्टात आणण्याची ही खेळी आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी वारंवार आरक्षणाचा मुद्दा चर्चेत ठेवून आरक्षणविरोधी वातावरण निर्मिती केली. आरएसएसची विचारसणीच आरक्षणविरोधी आहे. त्यांना देशातील आरक्षण संपुष्टात आणायचे आहे, असा आरोपही पटोले यांनी केलाय.

‘पंकजा मुंडे, बावनकुळे हे फक्त चेहरे’

ओबीसींच्या आरक्षणासाठी आवश्यक असणारी आकडेवारी केंद्राकडे आहे. परंतु भाजप नेते त्यासाठी राज्य सरकारकडे बोट दाखवत आहेत. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याच विभागाने 2017 साली अध्यादेश काढला होता. त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. त्यांचे मंत्रालय नागपूरच्या रेशिमबागेतील आदेशावरून दुसरेच लोक चालवत होते. पंकजा मुंडे, बावनकुळे हे फक्त चेहरे आहेत, निर्णय घेणारे लोक वेगळेच होते. त्यामुळे पंकजा मुंडे, बावनकुळे आता काय बोलतात त्याला काही अर्थ नसल्याची टीकाही त्यांनी केलीय.

भाजपने घात केल्याचा गंभीर आरोप

ओबीसी समाजाने भारतीय जनता पक्षाला साथ दिली पण त्याच समाजाचा घात भाजपने केला आहे. भाजपच्या एका चुकीमुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेतील तब्बल 55 हजार ओबीसी लोकप्रतिनिधींवर कुऱ्हाड कोसळली आहे. याप्रश्नी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या पाच जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी यावेळी पटोले यांनी केलीय.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्ज्वल, मी स्वत: त्यांना भेटेन : संजय राऊत

काँग्रेसने सातत्याने ओबीसींवर अन्याय केला, म्हणून वडेट्टीवारांनी खदखद व्यक्त केली, प्रवीण दरेकरांचा टोला

Nana Patole criticizes Devendra Fadnavis on the issue of OBC reservation and political retirement

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.