काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर आनंदच : नाना पटोले
नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यपद सोपवलं जाण्याची चिन्हं आहेत. (Nana Patole says will be More than Happy if get Maharashtra State Congress President Responsibility)
नवी दिल्ली : पक्षाने महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. (Nana Patole says will be More than Happy if get Maharashtra State Congress President Responsibility)
पक्षाने महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर आनंदच होईल. राष्ट्रीय नेते जी जबाबदारी देतील, ती मी पार पाडेन. ही वेळ राजकारण करण्याची नाही. मिळेल ती जबाबदारी स्वीकारेन, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.
नाना पटोले यांच्या जागी काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर आक्रमक नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यपद सोपवलं जाण्याची चिन्हं आहेत.
हेही वाचा : आक्रमक नाना रिंगणात, अनुभवी बाबा सभागृहात? काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा
विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ही भेट होऊ शकली नाही. ‘कोरोना’ संकटामुळे आपण पुढच्या वेळी भेट घेऊ, असा निरोप राहुल गांधी यांच्याकडून नाना पटोले यांना देण्यात आला.
सध्या काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. मंत्रिपद, महाविकास आघाडीशी समन्वय आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशी तिहेरी जबाबदारी सांभाळताना बाळासाहेब थोरात यांची तारांबळ होत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे काँग्रेसमधील अनुभवी चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कोणतंही मंत्रीपद नाही, शिवाय पक्षातही महत्त्वाची जबाबदारी सध्यातरी नाही. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्यासाठी काँग्रेसमध्ये या अंतर्गत घडामोडी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद देऊन, आक्रमक नाना पटोले यांना थेट मैदानात उतरवून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्याची चिन्हं आहेत. (Nana Patole says will be More than Happy if get Maharashtra State Congress President Responsibility)
आक्रमक नाना रिंगणात, अनुभवी बाबा सभागृहात? काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चाhttps://t.co/sBMYjRxgT9 @NANA_PATOLE @prithvrj
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 28, 2020
संबंधित बातम्या
‘कोरोना’ संकटामुळे पुढच्या वेळी भेटू, राहुल गांधींचा नाना पटोलेंना निरोप
कोरोना लढाईत आम्ही आपल्यासोबत, राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन
महाराष्ट्रातील सरकार कुणाचे? दिल्लीत पोहोचताच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले….
(Nana Patole says will be More than Happy if get Maharashtra State Congress President Responsibility)