‘नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही…’ फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर चंद्रकांतदादांचे सर्व जिल्हाध्यक्षांना महत्वाचे आदेश

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह अनेक भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

'नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही...' फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर चंद्रकांतदादांचे सर्व जिल्हाध्यक्षांना महत्वाचे आदेश
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, नाना पटोले, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 7:29 PM

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण आता पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झालीय. पटोले यांनी ‘मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो’, असं वक्तव्य केलं आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोटोले यांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह अनेक भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

देवेंद्र फडणवीस यांचा पटोलेंवर घणाघात

‘पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो…काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही ? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटलांचे सर्व जिल्हाध्यक्षांना आदेश

‘नेता तैसा कार्यकर्ता, त्यांचे राष्ट्रीय नेते मध्येच गायब होतात, काहीही बोलतात, परिणाम काय होईल, परंपरा काय त्या मोडल्या जातील याची काळजी करत नाहीत. त्यात त्यांचे अध्यक्ष नाना पटोले वेगळं काय करणार? मी त्यांना भ्रमिष्ट म्हणत नाही, पण भ्रमिष्टासारखं त्यांचं वर्तन सुरु आहे. पंजाबमधील घटनेला ते नौटंकी काय म्हणाले, अमित शाहांवर त्यांनी आरोप केला की त्याचाच हा कट आहे. काय बोलतो, काय अर्थ होतो, याचा काही त्यांना पत्ता नाही. भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही. त्यांनी जेव्हा नौटंकी म्हटलं त्यावेळी आम्ही राज्यभरात केसेस दाखल करण्याचा प्रयत्न झाला. पण कुठल्याही पोलीस ठाण्यात केस दाखल होऊ शकली नाही. राणे साहेबांनी नितेश कुठे आहे हे माहिती असल्याचं वक्तव्य केल्यानंतर पोलीस त्यांच्या घरावर नोटीस लावायला पोहोचले. राणे साहेब म्हणाले असतो तर एक थोबाडीत मारली असती, त्यावर त्यांना अटक केली. पण नाना पटोलेंना हात लावायची हिंमत नाही. कारण काँग्रेस पाठिंबा काढून घेईल. सगळं खुर्चीभोवती सुरु आहे. भाजप हे सहन करणार नाही. आम्ही सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगणार आहोत की आपल्या जिल्ह्यात या विषयावर आक्रमक व्हा’, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.

प्रविण दरेकरांनी पटोलेंना फटकारलं

मला वाटतं अशा प्रकारचा व्हिडीओ असेल आणि पटोले कार्यकर्त्यांशी बोलत असताना असं वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे. आगामी राजकारणासाठी हे चिंताजनक आहे. खरं म्हणजे नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अशा प्रकारची वक्तव्ये अनेकदा त्यांनी केली आहेत. बोलू शकतो इथपर्यंत ठीक आहे. राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या नेत्यांवर टीका करतो, राजकीय टीका असतात, सरकार म्हणून टीका करतो. मात्र, अशा प्रकारचं वक्तव्य भयानक आहे. काँग्रेसला आज जरी देशभरात यश मिळालं नसलं तरी एक वैभवशाली परंपरा असलेला हा पक्ष आहे. अनेक चांगले नेते होऊन गेले आणि आजही आहेत. पण नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपणाचा बालिशपणा मांडून ठेवला आहे की, प्रत्येक आठवड्याला खालच्या पातळीची टीका करणं, बालिश वक्तव्ये करणं आणि आता तर पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आपण सरकार म्हणून, देशाचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो. पण याठिकाणी प्रत्येक गोष्टी राजकारण, तिरस्काराने पाहत असू, आता तरी मारण्याची भाषा होत असेल तर हे लाजिरवाणं आहे, अशा शब्दात दरेकर यांनी नाना पटोलेंना फटकारलं आहे.

नाना पटोले यांना समुपदेशनाची गरज- केशव उपाध्ये

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही पटोलेंवर खोचक टीका केलीय. “काँग्रेसचे नाना पटोले यांना ‘समुपदेशना’ ची गरज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाजी यांचा मोदीद्वेष नवा नाही. या द्वेषापोटी आपण काय बोलतो आहोत याचे भान त्यांना राहिलेले नाही. मा. मोदींजीच्या विरोधात वारंवार गरळ ओकल्याने आपल्याला राहुल गांधी ‘बक्षिसी’ देतील या समजापोटी ते वारंवार बेताल होऊ लागले आहेत. आज नानाजी जे काही बोलले आहेत ते पाहता त्यांच्या ‘समुपदेशना’ची गरज आहे असं दिसतं आहे. यापेक्षा त्यांच्या वक्तव्यावर वेगळया मार्गाने व्यक्त होता येणे अवघड आहे”, असं ट्वीट उपाध्ये यांनी केलंय.

पटोले यांचं नेमकं वक्तव्य काय?

इतर बातम्या : 

‘पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो’, नाना पटोलेंची सारवासारव, भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

शरद पवारांच्या मेट्रो पाहणीनंतर राजकारण जोरात! ‘यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती?’ रोहित पवारांचा चंद्रकांतदादांना टोला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.