AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP जवळ भ्रष्टाचाराचा खूप मोठा पैसा जमा झाला आणि हा पैसा ते…. नाना पटोले यांचा गंभीर आरोप

आपले पैसे काढून दोन उद्योगपती आणि दोन नेते असे चौघे मित्र हे पैसे वाटून घेतात. भय आणि भ्रष्टाचार करून लोकशाही विकत घेण्याचे काम या सरकारने केले.

BJP जवळ भ्रष्टाचाराचा खूप मोठा पैसा जमा झाला आणि हा पैसा ते.... नाना पटोले यांचा गंभीर आरोप
कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2022 | 7:32 PM
Share

पुणे : भारतीय जनता पार्टी जवळ भ्रष्टाचाराचा खूप मोठा पैसा जमा झाला आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे ओबीसी नाहीत, भाजप त्यांना ओबीसी (OBC) म्हणून प्रोजेक्ट करत असल्याचा घणाघातही नाना पाटोले यांनी केला. पुण्यात काँग्रेसच्या मंथन शिबीरात नाना पाटोले बोलत होते.

भारतीय जनता पार्टी जवळ भ्रष्टाचाराचा खूप मोठा पैसा जमा झाला आहे. आपले पैसे काढून दोन उद्योगपती आणि दोन नेते असे चौघे मित्र हे पैसे वाटून घेतात. भय आणि भ्रष्टाचार करून लोकशाही विकत घेण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोपही नाना पाटोले यांनी केला.

कायमच गुजरातचा डोळा हा आपल्या महाराष्ट्र वर राहिला आहे. आज उद्योग नेले उद्या पाणी नेतील आणि परवा आपली मुंबईच घेऊन जातील.

मी ओबीसी मंत्रालय काढण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली तर ते म्हणाले आता मंत्रालय कमी करायचे आहेत मग सहकार मंत्रालय का काढल? ज्या माणसाला सहकार माहिती नाही अशा माणसाला देशाचा सहकार मंत्री केलं म्हणजे आता तुमची वाट लागणार हे निश्चित अस नाना म्हणाले.

मोदीजींनी आपली जात देखील खोटी सांगितली ते ओबीसी नाहीत आणि हे खोटं आम्ही देशासमोर आणुच अशा इशाराही नाना पाटोले यांनी दिला.

मुस्लिमांकडील बिर्याणी लपून-छपून खातात. पण बाकी यांना मुस्लिमांकडून काही चालत नाही. भाजप आणि मोदी हे जाती-धर्माचं राजकारण करतात. त्यात फूट पाडण्याचं काम करत आहेत.

भाजपचे दोन दाढीवाले राहुल गांधी सारखे चालू शकतील का? असा सवाल उपस्थित करत नाना पटोले यांचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टोला लगावला.

ओबीसी समाजाचे दुःख फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाच माहिती आहे. अजय सिंग यादव यांनाही दुःख माहिती आहे, आणि म्हणूनच त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. या 75 वर्षात काँग्रेसने देशाला पुढे नेण्याचं काम केले आहे. स्वातंत्र्याच्या नंतर देशाला उभे करण्याचा प्रयत्न काँग्रेसने यशस्वी केला.

स्वतंत्र मिळाल्यानंतर आपल्या देशात काय होतं याचा विचार केल्यास काँग्रेसने देशासाठी काय काय केले याच उत्तर सापडेल. देश स्वतंत्र झाल्यावर आपल्याकडे पुरेसं सैन्य देखील नव्हतं. देशातील सगळ्या समाजाला न्याय देण्याचे काम साठ वर्ष काँग्रेसने केल आहे.

मागील आठ वर्षांमध्ये देशात काय चालले आहे. त्यांनी नारा दिला काँग्रेस हटाव देश बचाव पण भाजप आणि आरएसएसला हे माहिती नाही की काँग्रेस शिवाय देशाचा इतिहास पूर्ण होत नाही.

ओबीसी समाजाचे देखील या देशात मोठे योगदान आहे. शिवाजी महाराज हे देखील जातीने कुणबी होते, पण ते कुठल्या जातीचे नव्हते तर ते समाजाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लीमांच्या विरोधात होते असं नाही. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानच संपवलं आहे.

काँग्रेसच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये देखील निवडणुका व्हायच्या. भाजपवाले मेहबूबा मुफ्ती सोबत सरकारमध्ये बसले. तुम्ही तिथं आता निवडणुका का घेत नाहीत? असा सवाल नानांनी उपस्थित केला.

आता मीडिया किती खरं सांगेल याचा काही नेम नाही. कारण आता मीडिया देखील मोदी मीडिया झालाय. गांधी कुटुंबामध्ये एवढे प्रधानमंत्री झाले, तरीही राहुल गांधी आज भारत जोडो यात्रा करत आहेत. देशाचा तिरंगा स्वातंत्र्य आणि संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी ही यात्रा करत आहेत.

चांगदेव वाघावर बसून आले. पण, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेस भिंत चालवली त्यावेळेस ते त्यांना शरण गेले, आता सुद्धा काही लोक दिल्लीतून वाघावर बसून येतात. या भाजपने फक्त धर्माची अफीम पाजली अशी टीका नाना पाटोले यांनी भाजपवर केली.

सगळ्यात पहिल्यांदा राम मंदिराचं कुलूप राजीव गांधींनी उघडलं आणि तिथे जाऊन पूजा देखील केली. यांनी फक्त राम मंदिर साठी पैसे गोळा केले. मी देखील राम मंदिरासाठी पैसे आणि विटा गोळा करत फिरलो. पण मंदिराच्या ट्रस्टने सांगितलं की आमच्यापर्यंत पैसे आलेच नाहीत असा दावा देखील नाना पाटोले यांनी केला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.