Nanded | गणेशोत्सवात डॉल्बी डिजिटल लावू द्या, उदयनराजेंनंतर नांदेडच्या बालाजी कल्याणकरांची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन, वाद चिघळणार?

कोरोना संकटामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा सगळेच उत्सव धडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे डॉल्बीवरील बंदी उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. 

Nanded | गणेशोत्सवात डॉल्बी डिजिटल लावू द्या, उदयनराजेंनंतर नांदेडच्या बालाजी कल्याणकरांची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन, वाद चिघळणार?
डॉल्बी डिजिटलवरील बंदी उटवण्याची बालाजी कल्याणकर यांनी मागणी Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 12:47 PM

मुंबईः राज्यात दहीहंडीचा (Dahihandi) उत्सव दणक्यात साजरा झाल्यानंतर आता गणेशभक्तांना गणेशोत्सावाचे वेध लागलेत. कोरोना संकटामुळे दोन वर्षे सर्व उत्सव घरातच साजरे करावे लागले. त्यातच सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) आदेशानुसार, डॉल्बी डिजिटल साऊंडवर राज्य सरकारनेच बंदी घातली आहे. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बंदी हटवण्यात यावी अशी मागणी नांदेडचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भातील निवेदनही त्यांनी दिलंय. एकिकडे आमदारांनी ही मागणी केली आहे तर दुसरीकडे पोलिस प्रशासनही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झालंय. नांदेडमध्ये पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन नागरिकांना ध्वनीसंबंधी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहेत.

बालाजी कल्याणकरांचं निवेदन काय?

आमदार बालाजी कल्याणकर यांनी 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉल्बी संदर्भातील निवेदन दिलं. त्यात ते म्हणातात, ‘ नांदेड जिल्ब्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गणपती उत्सवात डॉल्बी डीजेवर बंदी घातलेली आहे. त्या अनुशंगाने आदेशही काढले आहेत. जिल्ह्यातील 300 ते 400 व्यावसायिक या व्यवसायावर आपल्या कुटुंबियांचे पालन पोषण करीतल आहेत. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले. त्यामुळे या व्यावसायिकांवर कुऱ्हाड कोसळली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. आता कुठे निर्बंध उठले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून डीजे वरील बंदीला स्थगिती द्यावी, अशी विनंती कल्याणकर यांनी केली आहे.

पोलिसांकडून शांततेचं आवाहन

दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलीसांतर्फे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. नागरिकांनी गणपतीच्या उत्सावात कोर्टाने जी आवाजाची मर्यादा घालून दिली आहे, तिचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टीममुळे वाद होण्याची चिन्हे आहेत.

nanded letter

बालाजी कल्याणकर यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

उदयनराजेंनीही केली होती मागणी

काही दिवसांपूर्वी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील डॉल्बी डिजिटलवरील बंदी हटवण्याची मागणी केली होती. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यावर अन्याय का करताय? एवढ्या आवाजाने काही फरक पडत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. कोरोना संकटामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा सगळेच उत्सव धडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे डॉल्बीवरील बंदी उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.