Anil Parab : नारायण राणेंनी बाह्या सरसावल्या, पहिला धक्का अनिल परबांना देण्याची तयारी

परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत आहे.

Anil Parab : नारायण राणेंनी बाह्या सरसावल्या, पहिला धक्का अनिल परबांना देण्याची तयारी
परिवहन मंत्री अनिल परब, केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 2:45 PM

सिंधुदुर्ग : परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत आहे. नारायण राणे यांना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता भाजप आणि नारायण राणेंकडून अनिल परबांवर अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

अनिल परब हे रत्नागिरीतील पत्रकार परिषदेदरम्यान पोलिसांच्या संपर्कात होते. त्याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला होता. नारायण राणे यांना ताब्यात घ्या, पोलीस फोर्स वापरा असं अनिल परब म्हणाले होते. त्यामुळे आता नारायण राणे आणि भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

चंद्रकांत पाटलांचा इशारा

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे थेट पोलिसांशी संवाद साधत असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. परब यांच्याविरोधात थेट कोर्टात जाणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

आम्ही अनिल परब यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. आम्ही ड्राफ्टिंग केलं आहे. टीव्ही9ने दाखवलेली क्लिप सर्व जगाने पाहिली आहे. किती कायदा हातात घेणं चाललं आहे? किती अरेरावी चालली आहे? पोलिसांच्या आणि गुंडाच्या बळावर हे सरकार चाललं आहे. यांच्यात सरकार चालवण्याची हिंमत नाही. ती क्लिप घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत. हे कशात बसतं हे विचारणार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

नारायण राणेंची पत्रकार परिषद

अटक आणि सुटकेच्या कालच्या नाट्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधणार होते. त्यामुळे राणे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून मोठं विधान केलं आहे. या ठगांपासून वाचण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

VIDEO : अनिल परबांचा पोलिसांना फोन

संबंधित बातम्या :  

EXCLUSIVE : नारायण राणेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी, अनिल परब सतत पोलिसांच्या संपर्कात, अटकेसाठी दबाव?

नारायण राणेंच्या अटकेसाठी मंत्री अनिल परबांचे फोन, खासदार विनायक राऊत म्हणतात, ‘मग त्यात गैर काय?’

राणेंच्या अटकेसाठी थेट पोलिसांशी संवाद, अनिल परब अडचणीत येणार?; चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं विधान

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....