Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकार पिंजऱ्यातून बाहेर पडत नाही, शिवसेना सर्व बटण दाबून करते, नारायण राणेंनी फटकारले

हा ग्राहकांवर अन्याय आहे. या विरोधात भाजप आवाज उठवेल," असा इशारा भाजप खासदार नारायण राणेंनी दिला आहे. (Narayan Rane criticism Shiv Sena) 

ठाकरे सरकार पिंजऱ्यातून बाहेर पडत नाही, शिवसेना सर्व बटण दाबून करते, नारायण राणेंनी फटकारले
नारायण राणे
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 6:32 PM

रत्नागिरी : “दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी शिवसेना सहभागी झाली नव्हती. याच मुद्यावरून भाजप खासदार नारायण राणेंनी सेनेला फटकारलं आहे. शिवसेना ही मागून असते. ते अंडरग्राऊंड असतात. मातोश्रीवरून बटण दाबलं की रस्त्यावर आलो. शिवसेना सगळं बटण दाबून करतात. मातोश्रीची सुरक्षा कडक केली आहे. त्यासाठी मातोश्रीला जाळ्या लावल्यात,” अशा मिश्कील टोला नारायण राणेंनी लगावला. (Narayan Rane criticism Shiv Sena)

“एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पिस्तूल हातात असणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या ट्विटवर राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेचे हे कार्य आहे. शिवसैनिकांना हायवेवर बाकी काही काम राहिलं नाही. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लक्ष द्यावं,” असेही नारायण राणे म्हणाले.

वीजबिलाच्या मुद्द्यावर भाजप आवाज उठवणार 

“थकित वीजबिल प्रकरणी सरकारने ग्राहकांना दणका दिला आहे. यावर नारायण राणेंनी महाविकासआघाडीला टार्गेट केलं. ठाकरे सरकारमध्ये काय हो पिंजऱ्यातून मातोश्रीतून बाहेर पडत नाही. मी हे करतो ते करतो असं मुख्यमंत्री सांगतात. एकीकडे वीजबिलं माफ केली जाईल असं सांगायचं आणि दुसरीकडे वीज तोडायची हा ग्राहकांवर अन्याय आहे. या विरोधात भाजप आवाज उठवेल,” असा इशारा भाजप खासदार नारायण राणेंनी दिला आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्याला शुभेच्छा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल नारायण राणेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचा दौरा यशस्वी होवो हीच शुभेच्छा. एखाद्या नेत्याला वाटलं जावं दर्शन करावं, तर यावर काय बोलणार. पण शुभेच्छा दौरा यशस्वी होवू दे अशी मार्मिक भाष्य नारायण राणेंनी केलं आहे. तर मनसे आणि भाजप युतीबाबचचे प्रयोजन मला माहित नाही अशी प्रतिक्रिया नाराय़ण राणेंनी दिली आहे. (Narayan Rane criticism Shiv Sena)

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळानरून शिवसेनेला भाजप खासदार नारायण राणेंनी फटकारलं. पाण्याशिवाय कसं काय वर्षभरात तारीख जाहिर करतात. चिपी विमानतळासाठी पाणी, विद्युत परवठा आणि रत्यासाठी 32 कोटी देवू शकले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अंगात पाणी नाही तर ते विमानतळाला पाणी कुठे देणार असा खोचक टोला राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळणावरून भाजप खासदार नारायण राणेंनी गोप्य स्फोट केला. ज्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनातून उद्रेक झाला. तिरंगा उतरवून या आंदोलनातून खलिस्थानाचा झेंडा फडकवला गेला. हे 16 पक्षांना मान्य आहे का? असा प्रश्न राणेंनी केला आहे. हे सगळे देशद्रोह्यांना समर्थन करत आहेत. हे खरे शेतकरी नाही. हे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मान्य आहे का? असेही राणे म्हणाले.

तुमच्या तोंडात साखर पडो, मंत्रिपदाच्या चर्चांवर उत्तर 

केंद्रात भाजप खासदार नारायण राणेंना मंत्रिपद मिळणार अशा चर्चा होत्या. त्यावर बोलताना भाजप खासदार नारायण राणेंनी गमतीदार उत्तर दिलं. पत्रकारांनी नाराय़ण राणेंना तुम्हाला मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे असं म्हणताच नारायण राणे खुर्चीवरून मागे वळाले कोण? मला विचारला का प्रश्न? असं म्हणत…मला काही माहित नाही तुमच्या तोंडात साखर पडो, असं सांगत या प्रश्नावर उत्तर देणं नारायण राणेंनी टाळलं. (Narayan Rane criticism Shiv Sena)

संबंधित बातम्या : 

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊत म्हणतात….

बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना बाळा नांदगावकर गहिवरले, म्हणाले….