…तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी नारायण राणेंचे ट्विट
भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले आहे. (Narayan Rane pays tribute Balasaheb Thackeray on death anniversary)
मुंबई: भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले आहे. “साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती”, असं म्हणत शिवसेनेच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवर बोट ठेवले. नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंनी पद आणि पैशासाठी प्रतारणा केली नसती, असं म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त नारायण राणे यांनी ट्विट केले आहे. (Narayan Rane pays tribute Balasaheb Thackeray on death anniversary)
माननीय शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. माननीय साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. पद आणि पैशासाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती. (१/२) pic.twitter.com/2mcFaZlfoK
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 17, 2020
महाराष्ट्रातील आताचे सरकार नीतिमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी हे घडू दिले नसते, असंही नारायण राणे म्हणाले.भाजप नेते नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना शिवसेनेचे नाव न घेता टोला लगावला आहे.
नितेश राणेंचेही ट्विट
नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा इंदिरा गांधींना अभिवादन करतानाचा फोटो ट्विट करत राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतील का?, असा प्रश्न विचारला.
It wouldn’t be wrong in expecting the same pic of Rahul Gandhiji in front of Late Balasaheb Thackerays photo frame on his death anniversary?? pic.twitter.com/N2PLGQTPiX
— nitesh rane (@NiteshNRane) November 17, 2020
दरम्यान, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत “हिंदुत्ववादी विचारांशी कधीही तडजोड न करणाऱ्या हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन”, अशा शब्दात अभिवादन केले.
भाजप नेते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी “बाळासाहेबांनी जो समाज विकासाचा आणि हिंदुत्वाचा जो मार्ग दाखवला, त्याच मार्गावरून जाण्याचा प्रयत्न मी भाजपमध्ये असलो तरी करत आहे”, अशा भावना व्यक्त केल्या.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना शिवशक्ती, भीमशक्ती आणि भाजप यांची एकजूट तुटल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. आगामी काळात शिवसेना, भाजप आणि रिंपाईने पुन्हा एकत्र येऊन एकजूट उभारली पाहिजे, ही खरी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
संबंधित बातम्या:
शिवशक्ती-भीमशक्ती-भाजपची एकजूट, हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली : रामदास आठवले
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विट, म्हणाले…
(Narayan Rane pays tribute Balasaheb Thackeray on death anniversary)