फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, आता राणेंचं थेट उत्तर

भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याला पाठिंबा नाही. पण राणेंच्या पाठीशी आहोत, असं विधान केलं होतं. (Narayan Rane)

फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, आता राणेंचं थेट उत्तर
Devendra Fadnavis, Narayan Rane
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 5:08 PM

मुंबई: भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याला पाठिंबा नाही. पण राणेंच्या पाठीशी आहोत, असं विधान केलं होतं. त्याला भाजप नेते नारायण राणे यांनी थेट उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेल, असं नारायण राणे म्हणाले. (narayan rane reply to devendra fadnavis over his comment)

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना फडणवीसांच्या विधानाबाबत आणि कोर्टाच्या आदेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावर राणे म्हणाले की, माझे शब्द बरोबर आहेत. कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवली ना. फडणवीस आमचे मार्गदर्शक आहेत. आम्हाला मार्गदर्शन करतात. ते जे सांगतील ते मी स्वीकारेल, असं राणेंनी सांगितलं.

हा क्राईम ठरत नाही का?

1 ऑगस्टला बीडीडी चाळीचं पूलबांधणीचा कार्यक्रम होता. त्याअगोदर आमचे आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवनाबद्दल काहीतरी वक्तव्य केलं होतं. आमच्या महिलांवर हात टाकला तर… असं बोलले होते. मी जे बोललो होतो आपल्या देशाला अभिमान नसेल. त्याला राष्ट्रीय सण माहीत नसतात. देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मला सहन झालं नाही. त्यामुळे मी ते बोललो. ते महाशय काय बोलले, म्हणजे मुख्यमंत्री, सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल तर त्याचं थोबाड तोडा, आदेश दिले. हा क्राईम नाही? 120 बी होत नाही?, असा सवाल त्यांनी केला.

पवारांना सवाल

दुसरं एक वाक्य आहे, योगी साहेबांबद्दल. हा योगी आहे का ढोंगी? चपलाने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारलं पाहिजे. तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल. मी आणि अमित शाह यांनी बसून ज्या काही पुढच्या वाटचालीबद्दल आखणी केली होती आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. हा अनपार्लमेंट्री शब्द नाही का? आपले आधी तपासले पाहिजे. याच्यात तो गाळलेला शब्द आहे. काय हो माननीय पवार साहेब? काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं बोलणाऱ्याला मुख्यमंत्री केलं ते चुकीचं केलं असं वाटत नाही का?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांची काय भाषा आहे. आम्ही राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो, असं ते म्हणाले. (narayan rane reply to devendra fadnavis over his comment)

संबधित बातम्या:

सिंधुदुर्गात जमावबंदी; राणे म्हणतात, सिंधुदुर्गापासूनच जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार, त्यात व्यत्यय येणार नाही

उद्धव ठाकरेंच्या भाषेवर राणेंचे तीन प्रश्न, राणे म्हणतात, योगी, शहांबद्दल ही काय भाषाय?

राणे सत्तेच्या जोरावर तत्त्वज्ञान पाजळत होते, कालच्या प्रकाराने गुर्मी उतरवली; वैभव नाईकांचा घणाघात

(narayan rane reply to devendra fadnavis over his comment)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.