Narayan Rane : नारायण राणेंची शरद पवारांना धमकी, आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणं कठीण होईल

आमदार येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल." अशी थेट धमकी त्यांनी पवारांना दिली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Narayan Rane : नारायण राणेंची शरद पवारांना धमकी, आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणं कठीण होईल
नारायण राणेंची शरद पवारांना धमकी, आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणं कठीण होईलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 10:07 PM

मुंबई : काही वेळापूर्वीच शरद पवारांनी (Sharad Pawar) पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदारांनी मुंबईत येऊद्या, त्यातले अनेक आमदार एकनाथ शिंदेंचा पाठिंबा काढून घेतील. तसेच आम्ही बहुमत सिद्ध करू असा दावा केला. तसेच त्यांना मुंबईत तरी यावं लागेलं, असेही विधान केलं. मात्र त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट शरद पवारांनाच धमकी दिली आहे. “माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.” अशी थेट धमकी त्यांनी पवारांना दिली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांंनी बंड केल्यापासून हे सरकार पडणारच असे भाकीत राणे हे रोज वर्तवत आहेत. तसा इशाराही ते शिवेसनेला देत आहे.

नारायण राणे यांचं ट्विट

नारायण राणे यांचं दुसरे ट्विट

शरद पवार काय म्हणाले होते?

त्यांना इथे यावंच लागेल राज्यपालांपुढे यावं लागेल. किंवा विधानसभेत तरी यावं लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर आसाम किंवा गुजरातचे नेते त्यांना मार्गदर्शन करतील असं वाटत नाही, अशी कोपरखिळी पवारांनी लगावली होती. तर माध्यमातून काही गोष्ठी पुढे आल्या, ते नाकारता येत नाही. आमदार इथे आल्यानंतर ते ज्या पद्धतीने त्यांना नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती सांगतील. इथे आल्यावर आपण सेनेसोबत आहोत. हे सांगतील. बहुमत शिवसेनेसोबत आहे. हे सिद्ध होईल, असेही पवार म्हणाले होते. त्यावरच आता नारायणे राणे यांनी ट्विटचा भडीमार करत थेट पावारांनाच आता इशारा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीही आक्रमक भूमिका घेण्याची शक्याता आहे. राज्यातलं सत्तानाट्या सध्या वेगळ्याच दिशेला अशा प्रतिक्रियांमुळे जाताना दिसत आहे. तेही नाकारता येत नाही. त्यामुळे राजकारणाचा पुढचा चॅप्टरही लवकरच कळेल.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.